शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील अनेक इमारती विनापरवाना, कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज समितीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 18:30 IST

शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी इमारत बांधताना महापालिकेचे परवानगी आवश्यक आहे.

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत ज्या इमारती बांधल्या त्यातील एकाचीही परवानगी महापालिकेकडून घेतली नसून, यासाठीचे आवश्यक पैसेही भरले नसल्याचा मुद्दा मंगळवारी चर्चेत आला. त्यामुळे आता २०१५ नंतर विद्यापीठात बांधलेल्या सर्व इमारतींची माहिती मागवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कोल्हापूर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या हेरिटेज समितीची बैठक मंगळवारी झाली. यावेळी समितीचे सदस्य उदय गायकवाड, अमरजा निंबाळकर, प्रशांत हडकर, नगररचना विभागाचे सहा. संचालक आर. एस. महाजन उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या इमारतींचा मुद्दा चर्चेत आला.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी इमारत बांधताना महापालिकेचे परवानगी आवश्यक आहे. असे असताना विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळालेल्या निधीतून अनेक इमारती उभारल्या आहेत. परंतु, त्यातील एकाही इमारतीला महापालिकेची परवानगी घेतलेली नाही.दुसरीकडे अशी इमारत बांधताना महापालिकेकडे काही शुल्क भरावे लागते. परवानगी न घेतल्याने हे शुल्क देण्याचा प्रश्नच आला नाही. त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यावरून जोरदार चर्चा झाली. जर सर्वसामान्य नागरिकाला कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत घर बांधायचे असेल तर त्याला रीतसर पैसे भरावे लागतात. बांधकाम परवानगी घ्यावी लागते. मग शिवाजी विद्यापीठा याला कसे अपवाद ठरते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.शिवाजी विद्यापीठ ही जरी शैक्षणिक स्वायत्त संस्था असली, तरीही बांधकामाबाबतचे महापालिकेचे नियम त्यांना टाळता येणार नाही, असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. अखेर गेल्या सात वर्षांतील झालेल्या बांधकामांची माहिती शिवाजी विद्यापीठाकडून मागवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेला एक न्याय आणिएकीकडे जिल्हा परिषदेला महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वत:च्या जागेत व्यापारी संकूल उभारण्यासाठी महापालिकेकडे काही कोटी रुपये भरावे लागले. त्यानंतर बांधकामासाठी परवागनी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषदेला एक न्याय आणि शिवाजी विद्यापीठाला एक न्याय का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठMuncipal Corporationनगर पालिका