केंद्रातील मंत्रालय मल्टिस्टेट सोसायटींना लाभदायक : सुरेश वाबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST2021-09-13T04:24:10+5:302021-09-13T04:24:10+5:30

येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीस फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष वाबळे व फेडरेशनचे संस्थापक ॲड. गडगे ...

Mantralaya at the Center is beneficial to multistate societies: Suresh Wable | केंद्रातील मंत्रालय मल्टिस्टेट सोसायटींना लाभदायक : सुरेश वाबळे

केंद्रातील मंत्रालय मल्टिस्टेट सोसायटींना लाभदायक : सुरेश वाबळे

येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीस फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष वाबळे व फेडरेशनचे संस्थापक ॲड. गडगे यांनी भेट दिली. यावेळी ॲड. गडगे यांनी मल्टिस्टेट संस्थांना भेडसावणारा थकीत कर्जवसुलीचा प्रश्न केंद्रीय निबंधक यांच्याकडे फेडरेशनच्या वतीने मांडला असून, लवकरच केंद्रीय सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मल्टिस्टेट संस्थांच्या वसुलीसाठी संस्थेस अधिकार प्राप्त व्हावेत यासाठीचा मसुदा सादर करणार असल्याचे सांगितले. स्वागत सुकुमार पाटील, तर अध्यक्ष अनिल भोकरे यांनी फेडरेशनच्या कामाचा आढावा विषद केला. याप्रसंगी प्रा. डी. ए. पाटील, अरविंद मजलेकर, भूपाल गिरमल, विजय आवटी, कुमार पाटील, रमेश पाटील, वाडगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - १२०९२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट सोसायटीस सुरेश वाबळे व ॲड. गडगे यांनी भेट दिली.

Web Title: Mantralaya at the Center is beneficial to multistate societies: Suresh Wable