अंबप फाटा येथे अपघातात मनपाडळेचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:13+5:302021-01-13T05:03:13+5:30
नवे पारगाव : राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा येथे कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संभाजी खंडू चव्हाण (वय ४०, ...

अंबप फाटा येथे अपघातात मनपाडळेचा तरुण ठार
नवे पारगाव : राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा येथे कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संभाजी खंडू चव्हाण (वय ४०, रा. मनपाडळे ता. हातकणंगले) हा मोटारसायकलस्वार ठार झाला. त्यांची पत्नी माया (वय ३५) जखमी झाल्या. शुक्रवार रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघाताची नोंद आज रात्री वडगाव पोलिसांत झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संभाजी चव्हाण व त्यांची पत्नी माया हे मोटारसायकल (क्र. एम. एच.०९.ई एक्स ४६८५) वरून मनपाडळेहून वडगावला जात होते. अंबप फाटा येथे भरधाव कार (एम.एच.१४.जी. ए. ५६२३) ने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत संभाजी चव्हाण ठार झाले तर पत्नी माया गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. महादेव महिपती चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.
फोटो: ०९संभाजी चव्हाण