मनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:31 AM2019-12-04T11:31:00+5:302019-12-04T11:49:51+5:30

वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी दीड वर्षाने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर व मनीषा मसुरकर यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे ११ महिन्यांच्या शेवटच्या टर्मची नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.

Manisha Masurkar, Akshata Jaitapkar, Samita Kudalkar in the race for city president | मनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

मनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

googlenewsNext
ठळक मुद्देमनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतदीपा गजोबार यांचा राजीनामा : शेवटच्या टर्मची लॉटरी कोणाला?

वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी दीड वर्षाने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर व मनीषा मसुरकर यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे ११ महिन्यांच्या शेवटच्या टर्मची नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानचे वर्चस्व असलेली नगरपंचायत आता १०० टक्के भाजपच्या अधिपत्याखाली आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी वर्षभरापूर्वी स्वाभिमानमध्ये प्रवेश केल्याने स्वाभिमानच्या नगरसेवकांची संख्या १३ वर पोहोचली होती. तर विरोधी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या ४ वर आली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वाभिमान भाजपात विलीन झाल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या १७ झाली आहे.

वाभवे-वैभववाडीचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून निवडून आलेल्या परंतु इतर मागास प्रवर्गातील असलेल्या दीपा गजोबार यांच्या गळ्यात २४ मे २०१८ रोजी नगराध्यक्षपदाची माळ पडली होती. अनेक दावेदार असतानाही त्यांनी दीड वर्ष नगराध्यक्षपदाची खुर्ची सांभाळली. त्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार सोमवारी गजोबार यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्याकडे दिला.

नगराध्यक्षपदासाठी आरोग्य, शिक्षण समिती सभापती समिता कुडाळकर, अक्षता जैतापकर व मनीषा मसुरकर या तीन नगरसेविका दावेदार आहेत. यापैकी मनीषा मसुरकर या मूळ भाजपच्या नगरसेविका आहेत. तर कुडाळकर आणि जैतापकर स्वाभिमान पक्षाच्या विलिनी-करणामुळे भाजपवासी झाल्या आहेत.

गेल्यावेळी जैतापकर व कुडाळकर प्रबळ दावेदार असताना गजोबार यांना संधी दिली. त्यामुळे शर्यतीत असलेल्या जैतापकर, मसुरकर व कुडाळकर यांच्यापैकी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

अधिक काळाच्या संधीने मी समाधानी!

नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबाबत दीपा गजोबार यांच्याकडे विचारणा केली असता, सव्वा वर्षाकरिता पक्षाने आपल्याला संधी दिली होती. त्यापेक्षा अधिक काळ पदावर राहिले. त्यामुळे मी समाधानी आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे, असे गजोबार यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Manisha Masurkar, Akshata Jaitapkar, Samita Kudalkar in the race for city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.