शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून कचऱ्यापासून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 01:05 IST

‘एकटी’चे घेणार सहकार्य : पथदर्शी प्रकल्पाचे कामकाज मंगळवारपासून सुरू

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील सहा प्रभागांतील ओला कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प मंगळवार(दि.२)पासून सुरूकरण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन हा प्रकल्प राबविण्याकरिता शहरातील ‘एकटी’ या स्वयंसेवी संघटनेचे सहकार्य घेणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे ‘एकटी’ या स्वयंसेवी संस्थेने निर्माण चौकालगत असलेल्या मैलखड्डा परिसरात दैनंदिन दीड टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प उभारला असून, तो आॅक्टोबर २०१६ पासून कार्यान्वीत झालेला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला असल्यामुळे महापालिका प्रशासनही असेच छोटे-छोटे प्रकल्प शहरात सुरूकरण्याच्या विचारात आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून पुईखडी येथे चार प्रभागांसाठी पथदर्शी प्रकल्प साकारला जात आहे.उपनगरातील कळंबा फिल्टर हाऊस, सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर, फुलेवाडी, कणेरकर नगर, जीवबा नाना पार्क अशा सहा प्रभागांतील ओला कचरा गोळा करून तो पुईखडी येथील केंद्रावर पोहोचविला जाईल. तेथे तो कुजविला जाऊन त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. वरील सहा प्रभागांतील सुका कचरा आठवड्यातून एकदा ‘एकटी’तर्फे उचलला जाणार आहे. पुईखडीजवळील सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरात अन्य काही ठिकाणी असे प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसबा बावडा येथील जागेवरचा ताण कमी होईल, कचरा वाहतुकीचा खर्चही कमी होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांची मोठी मदत एकटी संस्थेने सुरूकेलेल्या सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रकल्पास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठी मदत केली आहे. बारा लाखांचे आॅर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीन, घंटागाड्या, महिला कर्मचाऱ्यांना अ‍ॅप्रन, हँडग्लोव्हज, शूज, खोरी, घमेली असे साहित्य घेऊन दिले आहे. मंत्री पाटील यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले, असे ‘अवनि’च्या अनुराधा भोसले व ‘एकटी’च्या मनीषा पोटे यांनी सांगितले.असा आहे ‘एकटी’चा प्रकल्पतपोवन व रामानंदनगर-जरगनगर प्रभागांतून कचरा गोळा केला जातो.प्रत्येक प्रभागात चार घंटागाड्या, आठ परिसर विकास भगिनी व एक सुपरवायझर काम करतो. कचरा वर्गीकरण, शिवाय मैलखड्डा येथील केंद्रात पुन्हा वर्गीकरण केले जाते. प्रत्येक दिवशी दीड टन ओला कचरा गोळा केला जातो. आॅर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर (ओडब्ल्यूसी)मशीनमध्ये ओला कचरा बारीक केला जातो.प्लास्टिक कचऱ्याची स्क्रॅप डीलरला विक्री केली जाते.दहा दिवसांत सेंद्रिय खत तयार होते.