At Mangarayachi Wadi, he beat his father-in-law by putting a stool on his head | मंगरायाची वाडी येथे स्टूल डोक्यात घालून सासऱ्यास मारहाण

मंगरायाची वाडी येथे स्टूल डोक्यात घालून सासऱ्यास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : मंगरायाची वाडी येथे सोने परत दे असे म्हणत सासऱ्यास स्टूलने मारहाण करून एकास बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी कोल्हापूर येथील जावयासह सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हा प्रकार काल,गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री उशिरा वडगाव पोलिसात नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी विनायक संतोष भिसे, रेखा संतोष भिसे (रा.सरनोबत वाडी),अंबादास वाघमारे,कस्तुरी वाघमारे, रवी वाघमारे (रा.राजारामपुरी),माधुरी विकी शिंदे (रा.जवाहर नगर, कोल्हापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद सुभाष श्रीपती सगरे यांनी दिली आहे.तपास पोलीस नाईक बाबासाहेब दुकाने करीत आहेत.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विनायक संतोष भिसे (रा. सरनोबतवाडी, ता.करवीर ) यांचा मनीषा सगरे याच्याशी विवाह झाला होता.मनीषा हिचा शारीरिक व मानसिक छळ होत होता.म्हणून तिला वडील सगरे यांनी मंगरायाची वाडी येथे माहेरी आणले होते.

दरम्यान, कोल्हापूर येथून सासरचे सहा नातेवाईक रिक्षाने मंगरायाची वाडी येथे आले. यावेळी फिर्यादी व सासरे सगरे यांच्या घरासमोर येऊन सासरच्या घरातून आणलेले सोने परत दे असे म्हणत पती,पत्नीत वाद सुरू होता. यात सगरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता,जावई विनायक याने सासरे सुभाष यांच्या डोक्यात प्लास्टिकचा स्टूल घातला. तसेच घरातील अन्य पत्नी,मुलगा सोडविण्यास आले असता,त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Web Title: At Mangarayachi Wadi, he beat his father-in-law by putting a stool on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.