शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:06 IST

राज्यात असा निर्णय घेणारी 'ही' पहिलीच ग्रामपंचायत असून कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे.

अभय व्हनवाडेरुकडी/माणगांव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवले जात आहे. मात्र या अभियानाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत घरोघरी राष्ट्रध्वजाबरोबरच संविधान प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच राजू मगदूम यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात असा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असून कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे. याच गावात संपूर्ण देशभर अस्पृश्योद्धाराच्या नव्या पर्वाला सुरुवात करणारी पहिली अस्पृश्य परिषद भरली होती.राष्ट्रध्वजाबरोबरच संविधान प्रत देण्याच्या या निर्णयाबरोबर विधवा महिलांना समाजात स्थान मिळावे याकरीता विधवा महिलांस १४ ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक सरपंच करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये याबाबत चिठ्ठीव्दारे नाव ठरविण्यात आले. यात सरपंच म्हणून वंदना जाधव व उपसरपंचपदी प्राजक्ता पोवार यांना हा सन्मान  देण्यात  येणार आहे. तर, १५ ऑगस्ट रोजी सरपंच म्हणून सपना पाटील यांची निवड करणेत येणार असल्याची माहिती राजू मगदूम त्यानी  दिली.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायतीत  विविध कार्यक्रम आयोजित  केले असून दि .१३ ऑगस्ट रोजी गावातील माजी सैनिकांचा सन्मान तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ७५ जेष्ठ नागरीकांचा सन्मान होणार आहे. याच रोजी  माजी सैनिकांच्या हस्ते ग्रामपंचायत  शाळा, विद्यालय, आरोग्य केंद्रासह सरकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गावर दोन्ही बाजूस 600 मीटर पर्यंत ध्वज फडकावण्यात येणार असून सर्व भिंतीवरतीही तिरंगा रंगात लेजरशो करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतIndependence Dayस्वातंत्र्य दिन