माणगाव कोरोनाचा हाॅटस्पाॅट; दोन दिवसांत १९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:08+5:302021-05-24T04:23:08+5:30

रुकडी माणगाव : माणगाव (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचे दोन दिवसांत १६ कोरोनाबाधित, तर तीन रुग्ण संशयित आढळल्याने नागरिकांत अस्वस्थता ...

Mangaon Corona Hotspot; 19 patients in two days | माणगाव कोरोनाचा हाॅटस्पाॅट; दोन दिवसांत १९ रुग्ण

माणगाव कोरोनाचा हाॅटस्पाॅट; दोन दिवसांत १९ रुग्ण

रुकडी माणगाव

: माणगाव (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचे दोन दिवसांत १६ कोरोनाबाधित, तर तीन रुग्ण संशयित आढळल्याने नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.

माणगाव येथे कडक लाॅकडाऊनचे अंमलबजावणी करूनही जास्त रुग्ण दोन दिवसांत आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासनासमोर पेच निर्माण झाले आहे. लाॅकडाऊनच्या दरम्यान गावातील नागरिक बाहेर व बाहेरील नागरिक गावात येण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. यासाठी गावाचे प्रमुख मार्गही बंद करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. काळजी घेऊनही रुग्ण वाढत असल्याने चिंता निर्माण होत आहे.

दरम्यान, जि. प. सदस्या वंदना मगदूम व उपसरपंच राजू मगदूम यांच्या प्रयत्नाने माणगाव येथे मोफत अँटिजन रॅपिड टेस्ट तपासणी केंद्र सुरू करण्यात आली असून, या केंद्रामध्ये दि. २२ रोजी पाच रुग्ण, तर दि. २३ रोजी नऊ रुग्ण कोरोनाबाधित, तीन रुग्ण संशयित आढळले आहेत. याशिवाय खासगी तपासणीमध्ये दोन रुग्ण बाधित आले असून, सापडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने संशयित रुग्ण यांना घोडावत येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

Web Title: Mangaon Corona Hotspot; 19 patients in two days