मणेर मज्जितचे काम कौतुकास्पद - ए. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:45+5:302021-06-09T04:28:45+5:30

कोल्हापूर : मणेर मज्जितच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन मोफत दिले जाते, हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गा‌र राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Maner Majjit's work is admirable - a. Y. Patil | मणेर मज्जितचे काम कौतुकास्पद - ए. वाय. पाटील

मणेर मज्जितचे काम कौतुकास्पद - ए. वाय. पाटील

कोल्हापूर : मणेर मज्जितच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन मोफत दिले जाते, हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गा‌र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी काढले. मज्जितच्या उपक्रमास मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मणेर मज्जितला जिल्हाध्यक्ष पाटील यांनी भेट दिली. आतापर्यंत मज्जितच्या वतीने ६०० सिलेंडर ऑक्सिजनचे वाटप केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, हिदायत मणेर, महेंद्र चव्हाण, सुनील देसाई, जहिदा मुजावर, निरंजन कदम, जहाँगीर अत्तार, रियाज कागदी, सुहास साळोखे, रियाज कागदी, राजू जमादार, नागेश शिंदे, सलीम मुल्ला, सोहेल बागवान, सुनील काटकर यांच्‍यासह मज्जितचे कार्यकर्ते हिदायत मणेर, शकील मणेर, इर्शाद टीनमेकर, हाजी मौला बागवान, इक्बाल मणेर, शकील पटवेगार आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : मणेर मज्जितच्या वतीने कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजनचे वाटप केले जाते. या मदत केंद्रास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भेट दिली. यावेळी महेंद्र चव्हाण, हिदायत मणेर, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

(फोटो-०८०६२०२१-कोल-मणेर मज्जित)

Web Title: Maner Majjit's work is admirable - a. Y. Patil