सांगलीचे हांडे कृषिभूषणचे मानकरी
By Admin | Updated: August 12, 2014 00:39 IST2014-08-12T00:15:30+5:302014-08-12T00:39:59+5:30
राज्यपालांच्या हस्ते वितरण : जुन्नरचे अनिल मेहेर ठरले कृषिरत्न

सांगलीचे हांडे कृषिभूषणचे मानकरी
नाशिक : राज्य सरकारचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार वारूळवाडी (ता. जुन्नर, पुणे) येथील शेतकरी अनिल मेहेर यांना जाहीर झाला आहे. यासोबत सन २०१३ साठीचे ७२ कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. गुरुवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये पुरस्कारांचे वितरण होईल.
वसंतराव नाईक कृषिभूषण - रमेश देशमुख (ठाणे), महादेव शेंडकर, श्रीराम गाढवे (पुणे), परमेश्वर राऊत (सोलापूर), संजय पाटील (कोल्हापूर), राजेंद्र हांडे (सांगली).
जिजामाता कृषिभूषण - मीलन कृष्णा राणे (रायगड), सुजाता अविनाश थेटे (अहमदनगर), मीनाक्षी मदन चौगुले (कोल्हापूर), वैजयंती विद्याधर वझे (कोल्हापूर), प्रमोद कल्लाप्पा चौगुले (कोल्हापूर), नागेश बामणे (कोल्हापूर).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ - तात्या हंबीर (ठाणे), लक्ष्मीकांत रेंगडे (पुणे), हेमंत सावंत (सिंधुदुर्ग), ज्ञानेश्वर रायते (पुणे), अशोक तुपे (अहमदनगर), अमोल जाधव (सातारा).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार - एकनाथ मोरे (रत्नागिरी), विजय पाटील (ठाणे), संतोष राऊत (पुणे), दौलत भोकरे (पुणे).
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) शेतकरी पुरस्कार - आनंद गायकवाड (ठाणे), नामदेव साबळे (सोलापूर), शैलेजा नावंदर (अहमदनगर), डॉ. प्रताप पाटील (सांगली).
उद्यानपंडित पुरस्कार - डॉ. मकरंद आठवले (रायगड), भीमराव गाजरे (पुणे), राजकुमार आठमुठे (कोल्हापूर). (प्रतिनिधी)