वडणगे सेवा संस्थेचा कारभार कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:23+5:302021-09-17T04:28:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील सेवा संस्थेचा सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थांमध्ये समावेश आहे. मोठ्या गावात ...

वडणगे सेवा संस्थेचा कारभार कौतुकास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील सेवा संस्थेचा सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थांमध्ये समावेश आहे. मोठ्या गावात एकच सेवा संस्था असलेल्या या संस्थेचा कारभार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. येथील सेवा संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल पाटील यांचा सत्कार व सभासदांना ठेव व्याज वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल पाटील म्हणाले, गावातील शिवपार्वती तलावाचे रखडलेले काम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आमदार पी. एन. पाटील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी सरपंच सचिन चौगले, बी. एच. पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मकबूल मुल्ला, सभापती सुनील लांडगे, बी. के. जाधव, वाय. के. चौगले, प्रशांत तेलवेकर, अनिल घाडगे, दीपक पाटील, आण्णासो देवणे उपस्थित होते.
फोटो : १६ वडणगे सत्कार
वडणगे (ता. करवीर) येथे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक मकबूल मुल्ला यांनी केला. यावेळी सभापती सुनील लांडगे, सरपंच सचिन चौगले, बी. एच. पाटील उपस्थित होते.