शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पुरुषाला लुटले, तिघा चोरट्यांचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 11:10 IST

कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ठळक मुद्देरिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पुरुषाला लुटले, तिघा चोरट्यांचे कृत्यराजारामपुरी आठव्या गल्लीतील प्रकार, सीसीटीव्हीमध्ये प्रकार कैद

कोल्हापूर : कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.अधिक माहिती अशी, संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) हे राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी जेवण करून ते शतपावलीसाठी कार्यालयातून बाहेर पडले. चालत राजारामपुरी आठवी गल्ली येथे गेले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अडविले.

दोघेजण खाली उतरले. त्यांतील एकाने खिशातून रिव्हॉल्व्हर बाहेर काढून त्यांचेवर रोखली. तर दूसऱ्याने त्यांना लाथाने मारुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेत पुन्हा तिघेही दुचाकीवरून पळून गेले. अचानक घडलेल्या प्रकाराने गुरव भांबावून गेले; त्यामुळे त्यांना दुचाकीचा नंबर पाहता आला नाही. त्यांनी कार्यालयात येऊन सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

राजारामपुरी परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा रस्त्यावर चोरटे बिनधास्तपणे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महिलांपाठोपाठ आता पुरुषांनाही लक्ष्य करू लागल्याने घबराट पसरली आहे. पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढत आहेत. चोरटे २० ते २५ वयोगटातील आहेत. ते सराईत असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी व्यक्त केली आहे.कोणीही उठतो रिव्हॉल्व्हर बाहेर काढतोकोणीही उठतो आणि रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो. कारवाई करणार कोण? त्यामुळे भीती कोणाच्या बापाची...,अशा अविर्भावात सराईत गुन्हेगार बेकायदेशीर पिस्तुल, रिव्हॉल्व्हर दिवसाढवळ्या जवळ बाळगून वावरत आहेत. या गुन्हेगारांकडे रिव्हॉल्व्हर आले कुठून? बेकायदेशीर हत्यारांची तस्करी आजही कोल्हापुरात होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

आंधळेपणाचे ढोंग करणाऱ्यां पोलिसांनी आता आपल्या वर्दीची लाज राखली पाहिजे. अशा गुन्हेगारांचा बिमोड केला पाहिजे. अन्यथा कोल्हापूरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्यास भविष्यातील मोठे अनर्थ टळतील. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर