उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील व्यक्ती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:47+5:302021-01-08T05:21:47+5:30

कोगनोळी : मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळी येथील प्रकाश पीरगोंडा पाटील (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची ...

A man from Kognoli was found dead under a sugarcane trolley | उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील व्यक्ती ठार

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील व्यक्ती ठार

कोगनोळी : मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळी येथील प्रकाश पीरगोंडा पाटील (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश पाटील हे कोगनोळी बस स्थानकाकडून पी अँड पी सर्कलच्या दिशेने जात होते. लोखंडे गल्ली येथील भीमनगरजवळ तेआले असता रस्त्यावरील खडकावरून त्यांची मोटरसायकल घसरल्याने कागल येथील शाहू कारखान्याकडे जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीखाली ते फेकले गेले. ट्रॉलीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टरचालक सौरभ राजाराम कोराने (वय २५, रा. नागाव, तालुका करवीर’ यास ताब्यात घेतले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: A man from Kognoli was found dead under a sugarcane trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.