शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील नागरिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:44 IST

Accident Kolhapur-मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून झालेल्या अपघातात कोगनोळी (तालुका निपाणी) येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश पीरगोंडा पाटील (काका) (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देउसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील नागरिक ठाररस्त्यावरील खडकावरून त्यांची मोटरसायकल घसरल्याने अपघात

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून झालेल्या अपघातात कोगनोळी (तालुका निपाणी) येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश पीरगोंडा पाटील (काका) (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, की प्रकाश पाटील हे कोगनोळी बस स्थानकाकडून पी अँड पी सर्कलच्या दिशेने जात होते. लोखंडे गल्ली येथील भीम नगर जवळ आले असता रस्त्यावरील खडकावरून त्यांची मोटरसायकल घसरल्याने ते कागल येथील शाहू कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली फेकले गेले. ट्रॉलीचे चाक त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टरचालक सौरभ राजाराम कोराने (वय २५) रा. नागाव तालुका करवीर यास ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर