कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दारूच्या वादातून कोयत्याने झालेल्या हल्ल्यातील जखमी झालेला बाळासो शामराव देसाई (वय ३७, रा. दत्तवाड) याचा शनिवारी (दि. १८) रात्री सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी वाल्मीकी घडसे (रा. दत्तवाड) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि. १०) ही घटना घडली होती.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी घडसे व मयत देसाई दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन घडसे याने देसाईंच्या कानशीलात मारली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. १०) याचा जाब विचारण्यासाठी देसाई याने आपला मित्र सुनील मगदूम याला घेऊन घडसे याच्या घरी गेला होता. त्याठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याने घडसे याने देसाईसह मगदूम याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवार (दि. १८) रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिस कॉन्स्टेबल विवेक कराडे यांनी आरोपी घडसे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.
Web Summary : A man died in Sangli hospital after being attacked with a sickle over a dispute about alcohol in Dattwad. The accused, Valmiki Ghadse, has now been charged with murder. The victim, Balaso Desai, had gone to confront Ghadse with a friend before the attack.
Web Summary : दत्तवाड में शराब को लेकर विवाद के बाद एक व्यक्ति पर दरांती से हमला किया गया, जिससे उसकी सांगली अस्पताल में मौत हो गई। आरोपी वाल्मीकि घडसे पर अब हत्या का आरोप लगाया गया है। पीड़ित बालासो देसाई एक दोस्त के साथ घडसे का सामना करने गया था।