मालवण समुद्र किनाऱ्यावर
By Admin | Updated: April 13, 2015 00:01 IST2015-04-12T23:11:07+5:302015-04-13T00:01:04+5:30
‘व्हेल’ मासा आढळला मृतावस्थेत

मालवण समुद्र किनाऱ्यावर
मालवण : मालवण समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात रविवारी व्हेल जातीचा भेरा नावाचा मासा सापडला. सुमारे १२ फूट लांब व आकाराने भला मोठा असणारा हा मासा किनारी येईपर्यंत मृत झाला. हा मासा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी या महाकाय ‘व्हेल’ला आपल्या मोबाईलमध्ये बंद केले.
रविवारी सकाळी हा मासा स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला. हा मासा खाण्यायोग्य नसल्याने मच्छिमारांनी त्याला पुन्हा समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मृत झाला होता.
व्हेल जातीतील हा मासा समुद्री जलचक्रातील महत्त्वाचा दुवा समजला जातो. स्थानिक भाषेत त्याला भेरा मासा असे म्हटले जाते. हा मासा मृत झाल्याने त्याला समुद्रकिनारी वाळूमध्ये दफन करण्यात आले. (प्रतिनिधी)