शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दुर्बिणीचे निर्माते वसंतराव गुंडाळे, कोल्हापुरात अनेक अवलिये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:54 AM

सहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी

संदीप आडनाईकसहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी परदेशी कॅमेरा पाहून तसाच देशी बनावटीचा कॅमेरा इथेच तयार केला. तो मी नव्हेच या नाटकासाठी म्हादबा मेस्त्री यांनी फिरता रंगमंच इथेच उद्यमनगरीत तयार केला. या साºयांनी कोल्हापूरच्या कलेचा वारसाच केवळ जपला असे नव्हे, तर त्यांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाचा ठसाही उमटविला. त्यांचाच वारसा चालविणाºयांच्या पंक्तीत खगोलप्रेमी वसंतराव गुंडाळे यांचे नाव घेता येईल.

वसंतराव हे मूळचे राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे. साखर कारखान्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंंग केमिस्ट म्हणून त्यांनी काम केले. १९९८ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चे कॅमेरा आणि प्रिंटरसंदर्भातील दुकान सुरू केले. याच्याजोडीलाच मित्र उत्तमराव खारकांडे यांच्यासोबत विज्ञान प्रसाराचे काम सुरू केले.डॉ. आर. व्ही. भोसले हे खगोलप्रेमी शास्त्रज्ञ. त्यांच्या आकाशदर्शन मंडळात गुंडाळे हे खारकांडे यांच्यासोबत सहभागी झाले. आकाशदर्शनाचा छंद लागला. त्यातून गोडी वाढत गेली.अवकाश दर्शनासाठी लागणारी दुर्बीण त्याकाळी फारच थोड्या लोकांकडे होती. डॉ. भोसले यांनी प्रेरणा देताच स्वत: अतिशक्तीशाली दुर्बीण बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यातून १९७२ मध्ये सहा इंची दुर्बीण त्यांनी बनविली. तेव्हा २५,000 रुपये त्यांना खर्च आला. या यशानंतर त्यांनी पुन्हा १९७४ मध्ये १२ इंची दुर्बीण बनविली. यासाठी ७0,000 खर्च आला. सहा इंची दुर्बिणीसाठी त्यांना वर्षभर कष्ट करावे लागले. १२ इंची दुर्बिणीसाठीही त्यांनी वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले.एकमेव दुर्बीणवसंतराव गुंडाळे यांनी या दोन दुर्बिणीसाठी वर्षभर परिश्रम घेतले. या दुर्बिणींना आरसे बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पावडरने घासावे लागते. हे काम खूपच वेळखाऊ होते. डॉ. भोसले यांनी या दुर्बिणीसाठी लागणाºया अ‍ॅल्युमिनियमच्या कोटिंगसाठी मार्गदर्शन केले. त्यातून या दुर्बिणी साकारल्या. सध्या शिवाजी विद्यापीठात खगोलशास्त्राचे विद्यार्थी जी दुर्बीण वापरली जाते, ती अवघी पाच इंची आहे. गुडाळे यांच्या जिल्ह्यात एकमेव असणाºया या दोन्ही दुर्बिणींचा अवकाश निरीक्षणासाठी खूपच फायदा होतो.