आकाशकंदील, शुभेच्छापत्रे बनवा
By Admin | Updated: October 16, 2014 00:49 IST2014-10-16T00:14:26+5:302014-10-16T00:49:52+5:30
मुलांच्या सुप्त गुणांना वाव : ‘लोकमत’ बालविकास मंच व ‘सेव्हन वंडर्स द किड्स वेअर’तर्फे आयोजन

आकाशकंदील, शुभेच्छापत्रे बनवा
कोल्हापूर : बालचमूंसाठी दिवाळीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ‘लोकमत’ बालविकास मंच आणि सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळा २० आॅक्टोबरला न्यू महाद्वार रोडवरील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये सायंकाळी चार ते सहा या वेळेत होईल.
दिवाळी काही दिवसांवर आली आहे. ती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी बालचमू सज्ज झाले आहेत. त्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ते तयारी करीत आहेत. गड, किल्ले तयार करीत आहेत. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमत बालविकास मंच, सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्यातर्फे आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत लोकमत बालविकास मंच सदस्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अन्य इच्छुकांकडून ३० रुपये प्रवेश शुल्क भरून घेतले जाणार आहे. आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्यासाठी आवश्यक साहित्य मुलांनी स्वत: आणावयाचे आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी १९ आॅक्टोबरअखेर शहर ‘लोकमत’ कार्यालयात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
कार्यशाळेत उत्कृष्ट आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनवणाऱ्यांना सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्याकडून गिफ्ट म्हणून शॉपिंग व्हौचर दिले जाणार आहे. मंगळवार पेठेतील बिनखांबी रोडवरील विठ्ठल प्लाझा येथील सेव्हन वंडर्स द किडस वेअर दुकानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास खरेदीवर दहा टक्के सवलत मिळणार आहे. आकाशकंदीलाचे धडे देण्यासाठी सांगलीतील रंगकिरण ग्रुपचे अमोल शिंदे, तर शुभेच्छापत्रे शिकविण्यासाठी इंद्रजा कुलकर्णी येणार आहेत. अधिक माहितीसाठी लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ कार्यालयात प्रत्यक्ष भेटून किंवा नितीन यांच्या ७७९८३४४७४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे साहित्य हवे...
आकाश कंदील तयार करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांनी मध्यम आकाराचे १०० यूज अॅँड थ्रो चहाचे कप, पिनांच्या बॉक्ससह स्टेपलर, फेव्हिबॉँड, गोल्डन तार एक, अब्लावर्क १०० टिकल्या, तर शुभेच्छापत्रासाठी कात्री, टू इन वन चिकट टेप, पट्टी, पेन्सिअल, रबर, फेवीकॉल, हॅँडमेड पेपर, आर्टपेपर, दोन वेगवेगळ्या रंगांचे टिंटेड पेपर, ओळखपत्र आकाराचा एक फोटो.