खेळासाठी मनपाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी

By Admin | Updated: March 17, 2015 00:11 IST2015-03-16T22:43:43+5:302015-03-17T00:11:51+5:30

मालोजीराजे : जलतरण तलावाचे उद्घाटन

Make a separate fund for the game | खेळासाठी मनपाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी

खेळासाठी मनपाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी

कोल्हापूर : नेमबाजी, जलतरण, शरीरसौष्ठव, फुटबॉल, क्रि केट, कुस्ती, हॉकी अशा सर्व प्रकारच्या खेळ प्रकारात कोल्हापूरच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावला आहे. त्या मानाने मनपातर्फे खेळाडूंना अत्यंत तोकड्या सुविधा उपलब्ध आहेत, क्रीडाक्षेत्रातील उज्ज्वल परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी महापालिकेने क्रीडा क्षेत्रासाठी वेगळ्या स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी सूचना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केली. रमणमळा येथील जलतरण तलावाचे २५ लाख रुपये खर्चून नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. थाटात झालेल्या या कार्यक्रमासाठी नगरसेवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूर ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत येथील खेळाडू सराव करतात. नगरसेवकांना पाच लाखांचा निधी मिळतानाही मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत तलावासाठी २५ लाखांचा निधी सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानेच उपलब्ध होऊ शकला. क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.  जलतरण तलावाच्या देखभालीवर मोठा खर्च येतो. देखभालीत कोणतीही कसूर करू नका. नगरसेवकांच्या वशिल्याने कोणीही मोफत पोहण्याचा प्रयत्न करू नका. येत्या आर्थिक बजेटमध्ये क्रीडाक्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महापौर तृप्ती माळवी यांनी दिले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, कांचन कवाळे, सरस्वती पोवार, माधुरी नकाते, शशिकांत पाटील, किरण शिराळे, जहाँगीर पंडत, श्रीकांत बनछोडे, राजू घोरपडे, दिगंबर फराकटे, संभाजी जाधव, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Make a separate fund for the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.