शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पुजारी हटवण्याचा जिल्हा परिषदेत ठराव करा

By admin | Updated: July 3, 2017 17:01 IST

कोल्हापूरात संघर्ष समितीची जि.प. अध्यक्षांकडे मागणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0३ : श्री अंबाबाई मंदिरामध्ये सरकारी पुजारी नेमावेत, महालक्ष्मीऐवजी सर्वत्र अंबाबाई असा बदल करण्यात यावा यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा अशी मागणी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी भाजपचे गटनेते अरूण इंगवले आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. दिलीप देसाई यांनी यावेळी निवेदनाचे वाचन केले. ९ जून २0१६ रोजी अंबाबाईला घागरा चोळी असा पोशाख घालण्यात आला. त्यामुळे भाविक संतप्त झाले. यापुढे कोणत्याही परिस्थितीत देवीला काठापदराची साडी परिधान करावी, नवरात्रामध्येही यात बदल होवू नये, पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी, शासन दरबारी सर्व कागदपत्रे, जाहीर निवेदने, फलकांवर, रेल्वेवर जिथे जिथे महालक्ष्मी असा उल्लेख आहे तेथे अंबाबाई असा उल्लेख व्हावा, राजर्षि शाहू महाराजांच्या आदेशाचा ‘तथाकथित’ म्हणून अवमान करणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांचा निषेध करावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आम्ही सर्वजण आपल्या भावनांशी सहमत आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊन सर्वसाधारण सभेत ठराव करू अशी ग्वाही यावेळी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिली. माजी महापौर आर. के. पोवार यांनी हा विषय अजेंड्यावर घेण्याची विनंती केली. मात्र अजेंडा आधीच गेला असून आयत्यावेळच्या विषयामध्ये हा विषय घेऊ असे अरूण इंगवले यांनी स्पष्ट केले. गावसभांमधूनही असे ठराव करण्यासाठी जिल्हा परिषदेने आवाहन करावे अशी सुचना यावेळी करण्यात आली. यावेळी बाबा पार्टे, सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील, सुरेश जरग, जयदीप शेळके, डॉ. जयश्री चव्हाण, सुनंदा चव्हाण, सुनिता पाटील, वैशाली महाडिक, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, सुधा सरनाईक, लता जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.