मिळालेल्या संधीचे सोने करा
By Admin | Updated: October 10, 2014 00:28 IST2014-10-10T00:23:16+5:302014-10-10T00:28:20+5:30
महेश काकडे : ‘केआयटी’मध्ये पायोनिअर २०१४-१५ पारितोषिक वितरण

मिळालेल्या संधीचे सोने करा
कोल्हापूर: ‘पायोनिअर’सारख्या स्पर्धेतून तुम्हाला नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले.
के. आय. टी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये ‘पायोनिअर २०१४-१५’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के. आय. टी.चे व्हाईस चेअरमन भरत पाटील होते.
यावेळी विविध २३ स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त ४६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी चेअरमन सचिन मेनन यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. अजय पोळ यांनी सूत्रसंचालन केले.
अभिव्यक्ती या संशोधन स्पर्धेतील विभागवार प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विद्यार्थी असे : मेकॅनिकल : प्रथम क्रमांक - आकाश लाकर, ओंकार कामत (केआयटी), द्वितीय : स्मिता चौगुले (केआयटी), तृतीय : पुरुषोत्तम आचार्य (एसबीजीआय, मिरज).
सिव्हिल एन्व्हायर्न्मेंट : प्रथम : सृजनी श्रावणे, समृद्धी पाटील (केआयटी), द्वितीय : रोहित ओसवाल, शंतनू गायकवाड (केआयटी), तृतीय : सुनील गावडे, दर्शन पाटील (अशोकराव माने जीओआय, वाठार).
कॉम्प्युटर / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी : प्रथम : जीवन घाटगे (केआयटी), द्वितीय : राजश्री कामटे (एसजीबीएलटी, बेळगाव), तृतीय : अश्विनी एकसंबेकर व पूजा पाटील (भारती विद्यापीठ). बायोटेक : प्रथम : मानसी गायकवाड, श्वेता देशपांडे (केआयटी), द्वितीय : अलिशा शिलेदार, मेहजबीन पीरजादे (केएलई, सीईटी, बेळगाव), तृतीय : सुचरिता कामत (एमआयटी, मणिपाल).
इलेक्ट्रॉनिक/ इले. अॅँड टेलिकम्युनिकेशन : प्रथम : स्नेहाली पाटील व एकता तोपरानी (केआयटी), द्वितीय : रविचंद पोळ, प्रणव जोशी (केआयटी), तृतीय : विनायक जाधव, विजयकुमार बी. (जे. जे. मगदूम कॉलेज, जयसिंगपूर).