शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:33 IST

: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.

ठळक मुद्देकर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींची बैठक

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आयोजित जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खासगी बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. महामंडळांतर्गत येणाऱ्या कोणत्याही बँकेने कर्जपुरवठा थांबवलेला नाही. कर्ज घेतलेल्या युवकांकडून त्याचा परतावा सुरळीत होत आहे.

राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, याच पद्धतीने इतर बँकांनी कक्ष स्थापन करावा. बोगस कर्जदारांना पाठीशी घातले जाणार नाही, पात्र लाभार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २७ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याकरिता योजनांची माहिती देणारे ऑनलाईन शिबिर घेतले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने, आदी उपस्थित होते.२५७७ लाभार्थ्यांना २१६ कोटींचा कर्ज पुरवठावैयक्तिक कर्ज योजनेत ६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील २,५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला. त्यातील २,२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती सतीश माने यांनी दिली.कागदपत्रांअभावी प्रकरणे प्रलंबितबँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा सुरु आहे. कागदपत्रांअभावी उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे सतीश माने यांनी सांगितले. कर्ज पुरवठ्यासाठी बँका मिळत नसल्याचा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा. कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही एजंटची मध्यस्थी लाभार्थ्यांनी घेऊ नये. अधिक माहितीसाठी समक्ष बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकांच्या प्रतिनिधींनी केले. 

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर