गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:53+5:302021-01-08T05:19:53+5:30

सडोली (खालसा) : करवीर तालुक्याच्या् शैक्षणिक वाढीसाठी प्रशासन कोणतीही मदत करण्यास तयार असून, यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न ...

Make an honest effort to increase quality: | गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा :

गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा :

सडोली (खालसा) : करवीर तालुक्याच्या् शैक्षणिक वाढीसाठी प्रशासन कोणतीही मदत करण्यास तयार असून, यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी गुरुवारी केले. त्या वाशी (ता. करवीर) येथील राजवीर स्कूलमध्ये शिक्षक कार्यशाळेत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती सुनील पोवार हेे होते.

यावेळी सुनील पोवार म्हणाले, करवीर तालुका शैक्षणिक गुणवत्तेत मागे का, यामध्ये शिक्षक कुठे कमी पडले आहेत याचे शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव, विस्तार अधिकारी विश्वास सुतार, भगवान चौगुले संस्थाध्यक्ष बी. ए. पाटील, मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोबत, विषयसाधन व्यक्ती ज्योती वेदांते, मनीषा जाधव, सुक्रांती भागवत, सतीश चव्हाण, आदी उपस्थित होते.

०७ करवीर कार्यशाळा

Web Title: Make an honest effort to increase quality: