शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: पालिकेच्या सत्तेसाठी छोट्या शहरांतही धावले मोठे नेते, कुठे काय घडले.. वाचा सविस्तर

By समीर देशपांडे | Updated: December 4, 2025 13:41 IST

काँग्रेसकडून एकमेव सतेज पाटील

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या रणधुमाळीचा धुरळा एकदा खाली बसला. परंतु, छाेट्या शहरांमधीलही सत्ता राजकीय पक्षांना किती महत्त्वाची असते या यंदा दिसून आले. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीदेखील या निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून आले. ही छोटी, मोठी शहरे विधानसभा, लोकसभेसह विधानपरिषदेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने कुठलीच कसर सोडायची नाही हे ठरवून या सर्वांनी काम केले आहे.चंदगड नगरपंचायतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी शिंदेसेनेला सोबत घेऊन भाजपचे बहुसंख्य उमेदवार असलेले पॅनेल कमळ चिन्हावर निवडणुकीत उतरवल्याने फडणवीस यांनी चंदगडला जंगी सभा घेतली आणि पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेमध्ये रोड शो केला. परंतु, ते व्यस्त वेळापत्रकातून ‘कागल’ला येऊ शकले नाहीत. शिंदे आले असते तर काही ठिकाणी त्यांच्या सेनेला बळ मिळाले असते.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हुपरी येथे सभा घेतली. चंद्रकांत पाटील हे जरी सांगलीचे पालकमंत्री असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी गडहिंग्लजपासून अनेक ठिकाणी छोट्या, मोठ्या सभा घेतल्या. तर मंत्री मुश्रीफ यांनी संपूर्ण लक्ष कागल, गडहिंग्लज आणि मुरगूडवर केंद्रित केले होते. पालकमंत्री आबिटकर यांच्या कार्यक्षेत्रात आजरा ही एकमेव नगरपंचायत आहे. त्यामुळे त्यांनी तिथले नियोजन प्रा. अर्जुन आबिटकर यांच्यावर सोपवून त्यांनी मुरगूडमध्ये अधिक लक्ष घातले.खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र या निवडणुकांसाठी पूर्ण वेळ दिला. चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, कुरूंदवाड या ठिकाणी सभा घेतल्या. खासदार धैर्यशील माने यांना हातकणंगलेसह त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी काम करावे लागले. एकमेकांच्या उलट असले तरी महायुतीचे नेते सक्रिय राहिले.

काँग्रेसकडून एकमेव सतेज पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा एकमेव आमदार सतेज पाटील यांच्यावरच होती. काँग्रेसने राज्य पातळीवरील कोणी नेते प्रचारासाठी पाठवण्याची फारशी तसदी घेतली नाही. विधानपरिषद तोंडावर ठेवून गेल्यावेळी सतेज पाटील यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला होता. परंतु, यंदा तितकी तडफ दिसली नाही. परंतु, जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली.

शाहू छत्रपती, आसगावकर अलिप्तचखासदार शाहू छत्रपती हे नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कुठल्या प्रचारात गेले नाहीत असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. आमदार जयंत आसगावकर हेदेखील कुठे प्रचारात दिसले नाहीत. काँग्रेसचे हे दोन्ही लोकप्रतिनिधी प्रचारात कुठे दिसत नसल्याची विचारणा स्थानिक पातळीवरून होत होती.

आमदारांच्या जोडण्याडॉ. विनय कोरे यांनी मलकापूर, पन्हाळा, वडगाव आणि हातकणंगले नगपालिका, नगरपंचायतीसाठी पूर्ण वेळ दिला. आमदार राजेंद्र पाटील यांनी शिराेळ तालुक्यात भाजपसह अन्य पक्षांनाही अंगावर घेत जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड नगरपालिकेसाठी राबले. आमदार अशोकराव माने यांनी पेठवडगाव, जयसिंगपूर, शिरोळच्या संघर्षात भूमिका बजावली. आमदार राहुल आवाडे हुपरीसह अन्य ठिकाणी सक्रिय होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Big Leaders Campaign in Small Kolhapur Cities for Municipal Power

Web Summary : For Kolhapur municipal elections, top leaders campaigned vigorously in smaller cities. Fadnavis, Shinde, and other ministers focused on local polls due to their importance in larger elections. Congress relied on Satej Patil; key figures remained uninvolved.