शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

नृसिंहवाडीला महापूराने ऊसाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 19:05 IST

Flood Rain Kolhapur :  जुलैमधील महापुरामुळे गावातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथली दत्तमंदिर, मिठाई दुकानदार, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मिठाई व्यापाऱ्यांचे फर्निचरचे पाण्यात बूडून नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनृसिंहवाडीला महापूराने ऊसाचे मोठे नुकसानव्यापाऱ्यांचे सुमारे सहा ते सात कोटीचे नुकसान

दीपक जाधवकोल्हापूर  :  जुलैमधील महापुरामुळे गावातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथली दत्तमंदिर, मिठाई दुकानदार, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मिठाई व्यापाऱ्यांचे फर्निचरचे पाण्यात बूडून नुकसान झाले आहे.

या महापुरात व्यापाऱ्यांचे सुमारे सहा ते सात कोटीचे नुकसान झाले आहे. सध्या दत्त मंदिरात पाणी असून नुकसानीचा अंदाज लावता येत नसला तरी सध्यस्थितीत देवस्थानचे कार्यालय वेदपाठशाळा व इतर असे मिळून अंदाजे ५०-६० लाखाचे नुकसान झाले आहे.शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक महापुराचा फटका बसणारे गाव म्हणजे नृसिहवाडी. या गावाला महापूर काळात बेटाचे स्वरूप येते. दत्तात्रयाची भूमी गेले तीन वर्षे संकटाशी सामना करत असुन यावर्षी २००५ व २०१९ च्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे.

पूर्वेला कृष्णा नदी तर दक्षिण व पश्चिमेकडून पंचगंगा नदीने गावाला वळसा घातला असून तिन्ही बाजुने गावाला पाणी वेढते. हे गाव कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसले असून लोकसंख्या ४१६८ तर गावात ६५७ पशुधन आहे.

यातील शंभर टक्के लोक व पशुधन स्थलांतरित करण्यात आले होते. गावचे एकुण क्षेत्रफळ ४१८ हेक्टर आहे तर २१ हेक्टर गावठाण असून प्रमुख पिक हे ऊस आहे. संपूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली गेले होते.

गावातील १० ते १५ घराची पडझड झाली असून २०१९ पेक्षा यावर्षी प्रशासनाने दिलेल्या पूर्व सुचने मुळे गावातील लोकांनी पाणी वाढेल तसे स्थलांतर केल्या मुळे नुकसान कमी झाले आहे. २०१९ मध्ये प्रशासनाने ५-६ कोटी ची मदत या गावात केली होती. त्यातुलनेत यावर्षीचे नुकसान कमी झाले आहे.

गाव १००% पूरग्रस्त झाले होते.२०१९ च्या तुलनेत यावर्षी प्रशासनाकडून मिळालेल्या सुचना मुळे गावकरी सावध होऊन स्थलांतरित झाले.सर्वाधीक नुकसान हे शेतीचे झाले असून सध्या ९९% गाव स्वच्छ झाले आहे यासाठी जिल्हापरिषद, पिपंरी-चिचवड महापालिका, शरद साखर कारखान्याने मोलाची मदत केली. जनावरांचा चारा व अग्निशमन शरद साखर कारखान्याने उपलब्ध करून दिला.तसेच लोकांची रहाण्याची सोय दत्त कारखान्याने केली होती.-पार्वती कुंभार, सरपंच.

२०१९ चा महापुर,२०-२१ चा कोरोना व आता महापूराने देवस्थानचे नुकसान झाले आहे. मंदिराची रंगरंगोटी,विद्युत दिवे,अन्नछत्र, वेदपाठ शाळा, ऑफिस फर्निचर याचे नुकसान झाले आहे.-अमोल पुजारी, देवस्थान विश्वस्त.

यावर्षी बाजारपेठेत १२ फुटांवर पाणी होत.कोरोणा काळात गेले दीड वर्ष दुकान बंद असल्याने नुकसान झाले आहे त्यात या महापुरात व्यापारी व्यापारीवर्गाचे ६-७ कोटीचे नुकसान झाले आहे.-अनंत धनवडे,अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन.

टॅग्स :floodपूरReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूरRainपाऊस