शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ अटकेत, गुन्हा दाखल झाल्यापासून होता पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:38 IST

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी; शाहूवाडी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या कारणातून १४ जुलै २०२४ रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळ याला शाहूवाडी पोलिसांनी बुधवारी (दि. २७) अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. दंगलप्रकरणी पोलिसांनी ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी २४ जणांना यापूर्वीच अटक झाली होती.विशाळगडावरील अतिक्रमणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १४ जुलै २०२४ रोजी कार्यकर्त्यांसह विशाळगडावर जाण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी पुण्यातील हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानचा बंडा साळोखे हे कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोहोचले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. त्याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी २४ जणांवर अटकेची कारवाई झाली होती. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ पसार झाला. तो पुण्यातील फुरसुंगी परिसरात असल्याची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला फुरसुंगी येथून ताब्यात घेतले. बुधवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

१३ महिने पसारगुन्हा दाखल होताच पडवळ पसार झाला होता. पोलिसांच्या चार पथकांकडून त्याचा शोध सुरू होता, तरी तो त्यांच्या हाती लागला नव्हता. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी तो कणेरी मठावरील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांसमोर तो कार्यक्रमात वावरत होता. तरीही त्याला अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली होती. याच गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी बंडा साळोखे हादेखील पसार होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अटक टाळण्यासाठी पडवळ पळून गेला होता. अखेर त्याला फुरसुंगी येथून अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून येणाऱ्या माहितीवरून तपास पुढे जाईल. - आप्पासो पवार, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी उपविभाग