सावंतवाडी नगरपरिषदेत ‘महिलाराज’
By Admin | Updated: December 24, 2015 00:56 IST2015-12-23T23:38:23+5:302015-12-24T00:56:27+5:30
विषय समिती सभापती पदाची निवडणूक : शर्वरी धारगळकर, देवेंद्र टेमकर, वैशाली पटेकर यांची निवड

सावंतवाडी नगरपरिषदेत ‘महिलाराज’
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेत सभापतीपदांमध्ये महिलाराज आले आहे. तीन समित्यांवर महिला सभापतीपदी, तर नगराध्यक्ष बबन साळगावकर स्थायी समितीवर पदसिद्ध सभापती, तर सदस्य राजन पोकळे, अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर यांची निवड करण्यात आली.
नियोजन जलनि:स्सारण पर्यटन व पर्यावरण समितीवर उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे दोन्ही पदसिद्ध सभापती समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर सदस्यपदी कीर्ती बोंद्रे्र, अनारोजीन लोबो, सुभाष पणदूरकर, सुधन्वा आरेकर यांची निवड करण्यात आली.
सावंतवाडी नगरपालिकेची विषय समितीची सभापती निवड बुधवारी पार पडली. यात पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापतीपदी अफरोज राजगुरू, आरोग्य समिती क्रीडा व ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती सभापतीपदी क्षिप्रा सावंत, तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी साक्षी कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे.
स्थायी समिती नगराध्यक्ष बबन साळगावकर, तर नियोजन व जलनि:स्सारण पर्यटन व पर्यावरण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची निवड करण्यात आली. येथील नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या सभापती निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार व मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी काम पाहिले.
पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापती अफरोज राजगुरू, तर सदस्य योगिता मिशाळ, वैशाली पटेकर, देवेंद्र टेमकर, राजू बेग कार्यरत राहतील. आरोग्य समिती, क्रीडा समिती क्षिप्रा सावंत, सदस्यपदी विलास जाधव, संजय पेडणेकर, उमाकांत वारंग, शर्वरी धारगळकर, महिला व बालकल्याण सभापतीपदी साक्षी कुडतरकर, उपसभापती शुभांगी सुकी, सदस्य वैशाली पटेकर, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे यांची निवड
झाली. (वार्ताहर)
स्त्रियांच्या सक्षमतेसाठी अनेक उपक्रम
सर्व सभापती व सदस्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अभिनंदन केले. प्रशासनाने आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला आम्ही योग्य तो न्याय देऊ, जोमाने काम करू तसेच तिन्ही सभापतीपदी महिलांना संधी मिळाल्याने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे नवनियुक्त सभापतींनी सांगितले.