भुदरगड तालुक्यातील सरपंचपदांवर महिलाराज
By Admin | Updated: August 1, 2015 00:22 IST2015-07-31T22:52:51+5:302015-08-01T00:22:42+5:30
आजपासून निवडी : ४५ पैकी २४ ग्रामपंचायतींवर आरक्षण, जोरदार मोर्चेबांधणी

भुदरगड तालुक्यातील सरपंचपदांवर महिलाराज
शिवाजी सावंत - गारगोटी -भुदरगड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ४५ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीचा ज्वर आता उतरला असून, आता सरपंचपदाचे वेध लागले आहेत. ४५ पैकी २४ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. १ ते १0 आॅगस्ट दरम्यान निवडी होणार आहेत.यावेळी स्थानिक नेत्यांनी वरच्या राजकारणाला तिलांजली देत गावावर आपली सत्ता कशी स्थापन होईल, यावर विशेष भर दिला आहे. सरपंच जरी आरक्षणाने अथवा स्थानिक तडजोडीने होणार असले, तरी बहुतांशी ठिकाणी तो पक्षाचा असे मोजमाप काढले जात आहे. सरपंच पदाच्या निवडी शनिवार (दि. १) ते सोमवार (दि. १0 आॅगस्ट) अखेर पूर्ण होणार आहेत. पंचेचाळीसपैकी बारा गावांमध्ये सर्वसाधारण खुल्या पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित आहे. अनुसूचित जाती पुरुष वर्गात मठगाव, मानी येथील प्रकाश मारुती कांबळे, नागरिकांचा मागास पुरुष प्रवर्गात ममदापूर येथील बिनविरोध शंकर दिनकर गुरव, पांगिरे येथील प्रज्योत परशराम जाधव, डेळे-चिवाळे येथील श्रावण विलास भारमल, नवरसवाडी येथील आनंदा रामचंद्र सोहनी, नागरगाव येथे नागेश पांडुरंग मगदूम, मोरेवाडी येथे वसंत श्रीपती चव्हाण, तर लोटेवाडी येथील हे पद आरक्षित असताना तेथे दोन महिला या प्रवर्गातील आहेत. तर खुल्या प्रवर्गात दोनवडे येथे संभाजी पाटील, नितवडे येथे सर्जेराव पाटील, बेडीव येथे कुंडलिक सावंत, भालेकरवाडी- थड्याचीवाडी येथे बाळासाहेब भालेकर हे बिनविरोध, तर सीताराम चौगले हे निवडून आले आहेत. त्यामुळे तेथे रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. हेळेवाडी येथे साताप्पा जाधव, कलनाकवाडी येथे रविराज संभाजीराव निंबाळकर, बामणे येथे प्रताप भैरू मेंगाणे, मिणचे खुर्द येथे रणजित राजाराम देसाई, नागणवाडी येथे अशोक रामचंद्र साळोखे, बसरेवाडी सोनुर्ली येथे बिनविरोध असल्याने फॉर्म्युलाप्रमाणे निवडी होतील.
शनिवार (१ आॅगस्ट) रोजी सालपेवाडी, म्हसवे, पांगिरे, कलनाकवाडी, पाचर्डे, तर सोमवारी (दि. ३) ममदापूर, बारवे, बेडीव, मिणचे खुर्द, नांदोली-करंबळी मंगळवारी (दि.४) आदमापूर, मोरेवाडी, आंबवणे, वासनोली, मुरुकटे, पंडिवरे, दोनवडे, म्हासरंग-उकिरभाटले, बुधवारी (दि. ५) नितवडे, शिवडाव, सोनुर्ली, भेंडवडे, गंगापूर, बामणे, पाळ्याचाहुडा, शनिवारी (दि. ८) पळशिवणे, लोटेवाडी, फणसवाडी, खानापूर, बसरेवाडी, नागणवाडी, हेळेवाडी, मठगाव, मानी, भालेकरवाडी-थड्याचीवाडी, बेगवडे, बिद्री, पेठ शिवापूर, नाधवडे, पाटगाव, मानोपे, नवरसवाडी, नवले, मेघोली, तांब्याचीवाडी, चिक्केवाडी, डेळे, चिवाळे, खेडगे-एरंडपे, तर सोमवारी (दि.१0) नांगरगाव या गावातील सरपंच निवडी होतील.
सतरा गावांमध्ये खास रस्सीखेच
सरपंचपदाचे संभाव्य हक्कदार अनुसूचित जाती प्रवर्गात नाधवडे येथे सीमा श्रीकांत कांबळे, बिद्री, पेठशिवापूर येथे प्रतीक्षा सचिन कांबळे, शिवडाव येथे शीतल सुनील कांबळे, वासनोली येथे बिनविरोध निवड झाली आहे. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गात नांदोली, करंबळी येथे बिनविरोध राजश्री प्रकाश गुरव, पाचर्डे येथे अंजना बाळासो सुतार, सालपेवाडी शोभा संजय रब्बे, खुल्या स्त्री प्रवर्गात मेघोली, नवले, खेडगे, एरंडपे, तांब्याचीवाडी, पाटगाव, मानाळे, पंडिवरे, बारते, बेगवडे, म्हासरंग, उकिरभाटले, आंबवणे, भेंडेवाडी, खानापूर, गंगापूर, पाळ्याचा हुडा, पळशिवणे, म्हसवे, आदमापूर, अशा सतरा गावांमध्ये खास रस्सीखेच होणार आहे.