माहीची सुरुवात दुर्गमानवाड सड्यावरच्या भैरीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST2021-02-26T04:35:55+5:302021-02-26T04:35:55+5:30
दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील श्री विठ्ठलाई देवीची सड्यावरच्या भैरीला बळीचा बकरा दिल्यानंतरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात ...

माहीची सुरुवात दुर्गमानवाड सड्यावरच्या भैरीतून
दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील श्री विठ्ठलाई देवीची सड्यावरच्या भैरीला बळीचा बकरा दिल्यानंतरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात गावा-गावांतील देवांच्या माहींची लगबग सुरू होते ही पूर्वी पास चालत आलेली परंपरा आजही सुरू आहे.
दुर्गमानवाड येथील श्री विठ्ठलाई देवी जागृत देवस्थान आहे. येथे पहाटे गुरव समाज व ग्रामस्थ देवीला अभिषेक घालून पूजा केल्यानंतर सकाळी १० वाजता सड्यावरच्या भैरीला बळीचा बकरा देण्यात येतो. दुपारी १२ वाजता दुर्गमानवाड येथून पालखी सड्यावरच्या भैरीला जाते येथे दुर्गमानवाड परिसरातील सर्व ग्रामस्थ व बलुतेदारांनी आपापल्यापरीने नैवेद्य दाखवून प्रसादाचा लाभ घेऊन आल्यानंतर सायंकाळी ५ वाजता पालखी सड्यावरून खाली मंदिरात येते व सांगता होते.
शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदीचा आदेश पाळून बलुतेदार व ग्रामस्थांनी हा सड्यावरच्या भैरीचा उत्सव साध्यापद्धतीने साजरा केला आहे.
प्रत्येक वर्षी फेब्रुवारी व मार्चमध्ये गावा गावातील ग्रामदेवतांचा माही उत्सव साजरा होत असला तरी त्याची सुरुवात मात्र दुर्गमानवाड सड्यावरच्या भैरीतून होते हे नाकारता येणार नाही असे बोलले जात आहे.