भाजप दक्षिण मंडल अध्यक्षपदी महेश मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:25 IST2021-04-02T04:25:07+5:302021-04-02T04:25:07+5:30
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर दक्षिण मंडल (ग्रामीण) अध्यक्षपदी महेश कुंडलिक मोरे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह ...

भाजप दक्षिण मंडल अध्यक्षपदी महेश मोरे
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर दक्षिण मंडल (ग्रामीण) अध्यक्षपदी महेश कुंडलिक मोरे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी त्यांना निवडीचे पत्र देले.
महेश मोरे यांनी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप क्रीडा जिल्हा अध्यक्ष या पदावर काम केले आहे. यासह पैलवान प्रतिष्ठानमार्फत त्यांनी ग्रामीण भागाशी वेगळी नाळ जोडली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे. निवडीसाठी भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.
फोटो नं. ०१०४२०२१-कोल-महेश मोरे (बीजेपी)