महेश जाधव ‘आजरा श्री’
By Admin | Updated: February 11, 2015 00:17 IST2015-02-11T00:14:01+5:302015-02-11T00:17:40+5:30
आजरा येथे शरीरसौष्ठव स्पर्धा

महेश जाधव ‘आजरा श्री’
आजरा : सलमान हेल्थ क्लब आजराच्यावतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश जाधव यांनी ‘आजरा श्री’, तर नियाज पटेल याने ‘सलमान श्री’ किताब पटकाविला.दाजी टोपले नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक अशोक चराटी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : आजरा शहर मर्यादित गट - सलमान श्री - नियाज पटेल, ५० ते ७० वयोगट - अनिकेत पारखे, आजरा श्री - महेश जाधव, बेस्ट पोझर - विकास पाटील, बेस्ट इम्प्रुव्हर - संग्राम सावंत.स्पर्धेत पंच म्हणून संजय धुरे, प्रा. केसरकर (गडहिंग्लज) यांनी काम पाहिले. यावेळी मज्जीद दरवाजकर, महंमद इम्तियाज शेख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)