शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघावर महायुतीचा झेंडा, विरोधी आघाडीचा धुव्वा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:12 IST

कोल्हापूरच्या धनश्रीदेवी धनराज घाटगे यांना सर्वाधिक मते

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (मार्केटिंग फेडरेशन)च्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनलने मंगळवारी दणदणीत विजय मिळवला. यापूर्वी सहा विभागांतील बारा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. महिला गटातून कोल्हापूरच्या धनश्रीदेवी धनराज घाटगे (कागल) यांनी बाजी मारली; तर जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप अरुण नरके हे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन काळे यांनी काम पाहिले.

मार्केटिंग फेडरेशनच्या १९ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ‘नागपूर,’ ‘अमरावती,’ ‘औरंगाबाद,’ ‘नाशिक’ व ‘पुणे’, ‘कोकण’ या सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा १२ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. ‘नांदेड’ विभागातील दाेन व राखीव गटातील पाच अशा सात जागांसाठी रविवारी राज्यातील विविध ठिकाणी ५५७ मतदान झाले होते. मंगळवारी, मुंबईत मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व सात उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

विभागनिहाय बिनविरोध निवडून आलेले संचालक असे नागपूर : अतुल गण्यारपवार (चामोशी, गडचिरोली) व सुभाष रघाताटे (चंद्रपूर)अमरावती : रमेश हिंगणकर (आकोट, अकोला) व नितीन हिवसे (अमरावती)औरंगाबाद : सुनील चव्हाण (अणदूर, तुळजापूर) व पांडुरंग घुगे (मेहगाव, औरंगाबाद)नाशिक : रोहित निकम (माचले, चोपडा) व संजय पवार (जळगाव)पुणे : राहुल काकडे (निंबूत, बारामती, पुणे), संदीप नरके (कसबा बोरगाव, कोल्हापूर)कोकण : जयंत पाटील (पेझारी, अलिबाग, रायगड) व प्रमोद रावराणे (एडगाव, सिंधुदुर्ग)

नांदेड विभाग एकूण मतदान ४१महायुती : आबासाहेब पाटील (सेलू बुद्रूक, लातूर) ३२ व बळवंत पाटील (बेट मोगरा, नांदेड) २६विरोधी : भरत चामले १८

राखीव गट :इतर मागासवर्गीय : दत्तात्रय पानसरे (घारगाव, अहमदनगर) ३३१विरोधी : प्रवीण देशमुख - २१७प्रकाश बन्सोड - २, सुरेश खैरे - ०.अनूसूचित जाती / जमाती : संजय सावकारे (सकोली, भुसावळ) - ३१०विरोधी : वसंतराव कांबळे - २४२, सुभाष पाटील - ०.भटक्या विमुक्त जाती / जमाती : अशोक हटकर (हिवरखेड, बुलढाणा)

विरोधी : सुदाम पवार - २२२, पुरुषोत्तम अलोणे - २

महिला : धनश्रीदेवी घाटगे (वंदूर, काेल्हापूर) ३३४ व अयोध्या धस (पिंपळगाव, धाराशिव) - ३२१विरोधी : अनुसया ठाकरे - १९४ व सायली भगत - १८८

धनश्रीदेवी घाटगे यांना सर्वाधिक मतेकागल (कोल्हापूर)चे माजी आमदार संजय घाटगे यांचे समर्थक धनश्रीदेवी धनराज घाटगे यांना सर्वाधिक म्हणजे ५५७ पैकी ३३४ मते मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर