कोल्हापूर : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोल्हापूर महापालिका निवडणूक आघाडी करून अथवा वेगवेगळे लढून निवडणुकीनंतर एकत्र येणे, असे दोन मतप्रवाह आहेत. मात्र, महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढणे योग्य ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अनिल घाटगे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी ५० जागांवर एकत्र लढू शकते, असे चित्र आहे. ३१ जागेवर दोन्ही पक्षांचे तुल्यबळ उमेदवार आहेत. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी. यामधून किमान ६५ जागांवर विजय मिळवता येणे शक्य आहे. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. याचप्रमाणे महापालिका निवडणूकही एकत्रच लढवावी. याचा विचार तीन्ही पक्षातील नेत्यांनी करावा, असेही घाटगे यांनी म्हटले आहे.