महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:01+5:302021-02-05T07:02:01+5:30

कुरुंदवाड : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खडतर जीवनप्रवास जगभरातील अनेक विचारवंतांना, अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरक व मार्गदर्शक ...

Mahatma Gandhi's thoughts are inspiring | महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी

महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी

कुरुंदवाड : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खडतर जीवनप्रवास जगभरातील अनेक विचारवंतांना, अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरक व मार्गदर्शक आहे. तसाच तो प्रत्येक साम्राज्यवादी, सत्ताधीशांना, हुकूमशहांना इशारा देणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. चंद्रकांत लेंगरे यांनी केले.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांद्वारे गांधींच्या विचारांचा जागर करण्यात आला. या जागर महोत्सवाचा समारोप कार्यक्रम येथील साने गुरुजी विद्यालयातील सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील होते.

यावेळी दादासो पाटील, महोत्सव समितीचे समन्वयक प्रा. दिलीप सुतार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सानेगुरुजी शिक्षण संस्थेच्या संचालिका जयश्री थोरत, डॉ. दीपक सूर्यवंशी, राजेश मडीवाळ, शरद आलासे, राजेंद्र देसाई, रोहिणी निर्मळे, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात धनश्री पोवार यांनी गायिलेल्या रघुपती राघव राजाराम या सुरेल लोकप्रिय गांधी भजनाने झाली. सच्चिदानंद आवटी यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो - ३००१२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे महात्मा गांधी जयंती महोत्सव समिती समारोपप्रसंगी प्रा. डॉ. चंद्रकांत लेंगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, प्रा. दिलीप सुतार उपस्थित होते.

Web Title: Mahatma Gandhi's thoughts are inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.