महारवतन, मुलकीपड जमिनीची खरेदी-विक्री थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:54+5:302021-04-16T04:24:54+5:30
मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महारवतन व मुलकी पड जमिनीची बेकायदेशीर सुरू असलेली खरेदी-विक्री थांबवावी, या मागणीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मोसम ...

महारवतन, मुलकीपड जमिनीची खरेदी-विक्री थांबवा
मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महारवतन व मुलकी पड जमिनीची बेकायदेशीर सुरू असलेली खरेदी-विक्री थांबवावी, या मागणीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मोसम येथे छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलकी पड संघर्ष समितीच्या वतीने अणुस्कुरा - मलकापूर मार्गावर पुकारण्यात आलेले आंदोलन संचारबंदीमुळे स्थगित करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. पंधरा दिवसांत महसूल विभागाने प्रश्न सोडविला नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा शंकरराव कांबळे यांनी दिला.
संचारबंदी असल्यामुळे आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केली. पंधरा दिवसांत संचारबंदी संपल्यावर आंदोलन करा, असे विजय पाटील यांनी सांगल्यानंतर आंदोलकांनी मागण्याचे निवेदन मंडल अधिकारी आर. एस. सुतार, तलाठी पी. के. मिठारी, मिलिंद चव्हाण यांच्याकडे दिले. यावेळी मुलकी पड समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे, जिल्हाध्यक्ष पूजा कदम, तेजश्री कुंभार, पांडुरंग कांबळे, तुकाराम कांबळे, माजी सभापती दगडू कांबळे, लक्ष्मण कांबळे, मनोहर कांबळे, राजेंद्र कांबळे, दगडू गुरव, अजय कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
मोसम (ता. शाहूवाडी) येथे मुलकी पड संघर्ष समितीच्या आंदोलनात समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्याशी आदोलन मागे घेण्यासाठी चर्चा करताना पोलीस निरीक्षक विजय पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.