महारवतन, मुलकी पड जमिनीची खरेदी-विक्री थांबविण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:27+5:302021-04-16T04:25:27+5:30

मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महारवतन व मुलकी पड जमिनीची बेकायदेशीर सुरू असलेली खरेदी-विक्री थांबवावी या मागणीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मोसम ...

Maharavatan, agitation to stop sale and purchase of civilian land | महारवतन, मुलकी पड जमिनीची खरेदी-विक्री थांबविण्यासाठी आंदोलन

महारवतन, मुलकी पड जमिनीची खरेदी-विक्री थांबविण्यासाठी आंदोलन

मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महारवतन व मुलकी पड जमिनीची बेकायदेशीर सुरू असलेली खरेदी-विक्री थांबवावी या मागणीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मोसम येथे छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलकी पड संघर्ष समितीच्या वतीने अणुस्कुरा - मलकापूर मार्गावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मुलकी पड संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी केले. पंधरा दिवसांत महसूल विभागाने प्रश्न सोडविला नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शंकरराव कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांनी जिल्ह्यातील मागासवर्गीय, अल्पभूधारक शेतकऱ्यांना महारवतन, मुलकी पड जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या. मात्र, त्या जमिनी धनदांडग्या लोकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खरेदी केल्या आहेत. अशा जमिनीची खरेदी-विक्री थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संचारबंदी असल्यामुळे आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल विभागाचे मंडल अधिकारी आर. एस. सुतार, तलाठी पी. के. मिठारी, मिलिंद चव्हाण यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनात मुलकी पड समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे, जिल्हा अध्यक्ष पूजा कदम, तेजश्री कुंभार, पांडुरंग कांबळे, तुकाराम कांबळे, माजी सभापती दगडू कांबळे, लक्ष्मण कांबळे, मनोहर कांबळे, राजेंद्र कांबळे, दगडू गुरव, अजय कांबळे, आदींसह मुलकी पड संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो

मोसम (ता. शाहूवाडी) येथे मुलकी पड संघर्ष समितीच्या आंदोलनात समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे यांना आंदोलन मागे घेण्यासाठी चर्चा करताना पोलीस निरीक्षक विजय पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Maharavatan, agitation to stop sale and purchase of civilian land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.