महाराष्ट्रातील एस्कॉर्ट फी रद्द
By Admin | Updated: September 5, 2014 00:52 IST2014-09-05T00:48:55+5:302014-09-05T00:52:13+5:30
पृथ्वीराज चव्हाण : जिल्हा लॉरी आॅपरेटर्सकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार

महाराष्ट्रातील एस्कॉर्ट फी रद्द
कोल्हापूर : एस्कॉर्ट फी रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्यावतीने नुकताच कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.
जकात रद्द केल्यानंतर शहराच्या हद्दीतून वाहतूक केला जाणारा माल जकात न भरता शहरांमध्ये उतरविला जात होता. यासाठी एस्कॉर्ट (देखरेख)फी आकारली जात होती. ही बंद व्हावी म्हणून राज्यातील लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले होते.
ही मागणी मान्य करीत त्यांनी एस्कॉर्ट फी रद्द केली. याबद्दल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यामार्फत हा विशेष सत्कार करण्यात आला. या निर्णयामुळे वाहतूकदारांचे महिन्याकाठी आठ हजार रुपये वाचणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस, वाहतूक संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय पवार, प्रकाश भोसले, दिनकर पाटील, शिवाजी चौगुले, विजय भोसले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)