शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र आघाडीवर : दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:17 IST

'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण

कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकूलपती दत्तात्रय भरणे यांनी केले.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, कृषी क्षेत्रात मुलींचा वाढता सहभाग हा सकारात्मक बदल असून, भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. ‘आनंद द्या आणि आनंद घ्या’ हा यशाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असेही त्यांनी आवाहन केले. येत्या १० दिवसांत मुलांच्या नवीन वसतिगृहास मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचेही त्यांनी स्मरण केले.कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी आभार मानले. डॉ. आनंद चवाई यांनी सूत्रसंचालन केले. मंत्री भरणे यांच्या हस्ते केंद्रीय कृषिमंत्री पुरस्कार प्राप्त शेतकरी, तसेच सात विविध संशोधन केंद्रासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, दत्तात्रय उगले, डॉ. गोरक्ष ससाने, डॉ. प्रशांत बोडके, मिलिंद ढोके, डॉ. इंदिरा घोनमोडे, डॉ. सुनील कराडे, डॉ. सोमनाथ माने, नगरसेवक आदिल फरास, बाबासाहेब पाटील, अरुण डोंगळे, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे उपस्थित होते.'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पणयावेळी मंत्री भरणे यांनी नियोजित मुख्य प्रशासकीय इमारत, सभागृह, नियोजित अतिथीगृह इमारतीची पाहणी केली. त्यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळील कृषी निविष्ठा उत्पादने व विक्री केंद्राचे उद्घाटन, उद्यानविद्या विभागांतर्गत 'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण, शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, नवीन विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Agriculture Leads with Artificial Intelligence: Datta Bharene

Web Summary : Maharashtra's agriculture sector is leading in AI use, says Minister Dattatraya Bharne at Mahatma Phule Agricultural University event. He inaugurated various development projects, highlighting the increasing participation of women and emphasizing student success. He also promised a new hostel.