शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Maharashtra Vidhan Sabha 2019: निवडणूक रिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 11:55 IST

विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतराबरोबरच राजकीय साठमारी जोरात सुरू असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रिंगणातून स्वताहून बाजूला जाणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.

ठळक मुद्देरिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार‘गणपतरावांपाठोपाठ कुपेकरांचा निर्णय

राजाराम लोंंढे

कोल्हापूर : विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतराबरोबरच राजकीय साठमारी जोरात सुरू असताना चंदगडविधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रिंगणातून स्वताहून बाजूला जाणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.वयोमानामुळे आपण विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय आमदार कुपेकर यांनी घेतला असला तरी ‘ईव्हीएच’ आंदोलनात आक्रमक भूमिका घेत कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांनी युवक क्रांती आघाडी करून चंदगड मध्ये त्यांनी पुढील राजकारणाची बिजे रोवली.

जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात त्या भाजपच्या बाजूनेच उभ्या राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. पण ‘चंदगड’ मतदारसंघात युतीत शिवसेनेकडे असल्याने त्यांची गोची झाली.

तरीही युती तुटली तर भाजपची उमेदवारी घ्यायची त्यामुळे गेली दीड-दोन महिने त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली. मात्र भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला, त्यात तळ्यात मळ्यात भूमिकेने राष्ट्रवादीमध्येही त्यांच्या विश्वासर्तसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गुरूवारी निवडणूक रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी (दि. २२) कार्यकर्त्यांचा त्यांनी मेळावा आयोजित केल्याने त्या पुन्हा ‘यू’ टर्न घेणार का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.‘गणपतरावांपाठोपाठ कुपेकरांचा निर्णय‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी आपण निवडणूकीला उभे न राहण्याचा निर्णय कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला. पण कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोध करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्यानंतर आमदार कुपेकर यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाchandgad-acचंदगडkolhapurकोल्हापूर