शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रस्थापितांना नाकारणाऱ्या वंचितच्या यादीत प्रस्थापितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:11 IST

प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध म्हणून स्थापन झालेल्या वंचित आघाडीने उमेदवारी देताना मात्र प्रस्थापितांनाच जवळ केल्याचे दिसत आहे. चंदगडमधून अप्पी पाटील व राधानगरीतून जीवन पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध केले आहे. याशिवाय कागलमध्ये भाजपचे सदस्य आणि बंडखोरी करून अपक्ष उमेदवार असलेले समरजितसिंह घाटगे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे.

ठळक मुद्देचंदगडमधून अप्पी पाटील, राधानगरीतून जीवन पाटील उमेदवारकागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा

कोल्हापूर : प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध म्हणून स्थापन झालेल्या वंचित आघाडीने उमेदवारी देताना मात्र प्रस्थापितांनाच जवळ केल्याचे दिसत आहे. चंदगडमधून अप्पी पाटील व राधानगरीतून जीवन पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध केले आहे. याशिवाय कागलमध्ये भाजपचे सदस्य आणि बंडखोरी करून अपक्ष उमेदवार असलेले समरजितसिंह घाटगे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे.सत्तेपासून वंचित राहिलेल्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. लोकसभेला प्रस्थापितांचे पारंपरिक गणित चुकविण्यात यश आल्याने विधानसभेला भूमिकेला महत्त्व आले. कोल्हापुरात आल्यानंतर आंबेडकर यांनी वंचित कदापिही प्रस्थापितांना जवळ करणार नाही, आम्ही तत्त्वांचे राजकारण करतो, असे जाहीरपणे सांगितले होते.

दक्षिण आणि करवीरमधून दिलीप कावडे व आनंद गुरव यांच्या रूपाने वंचित लोकांना उमेदवारी देऊन या उद्देशाची सुरुवात केली; पण दुसऱ्या यादीपासून वंचितचा मूळचा उद्देश बाजूला पडत गेला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आणि भाजप-शिवसेना युतीतून ज्यांना नाकारले गेले, त्यांनाच वंचितची उमेदवारी घेण्यासाठी गळ घालण्यात येऊ लागली.

यातूनच सुरुवातीला प्रकाश आवाडे, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दौलत देसाई, राजीव आवळे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला गेला; पण या सहाजणांनीही सावध भूमिका घेतल्याने वंचितला अन्य चेहरे देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यातून शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी, कोल्हापूर उत्तरला नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली.चंदगडमधून अप्पी पाटील, राधानगरीतून जीवन पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अप्पी पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. कागलमधून समरजितसिंह घाटगे यांना शाहूंचे वंशज म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. घाटगे हे भाजपचे सदस्य आहेत, त्यांनी म्हाडाचा राजीनामा दिला असला, तरी ते गेली पाच वर्षे सत्ताधाऱ्यांसोबतच होते. वंचितच्या प्रस्थापितविरोधी धोरणात या तीनही मतदारसंघातील भूमिका कशी काय बसते, अशी विचारणाच आता होऊ लागली आहे.वंचितचे उमेदवारराधानगरी : जीवन पाटील,करवीर : आनंद गुरव,उत्तर : राहुल राजहंस,शाहूवाडी : सुनील पाटील,हातकणंगले : शिवाजी कांबळे,इचलकरंजी : शशिकांत आमणे,शिरोळ : सुनील खोत,चंदगड : अप्पी पाटील 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभा