शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:26 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते आज, शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकरांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद कार्यरत आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेची ठरली.या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार जयंत आसगावकर, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर  म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.शिक्षण विषयात केजरीवाल सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू कराव्यात. तसेच अनेक शिक्षक चांगले काम करतात. परंतू अजूनही अनेकांचे शिक्षणाव्यतिरिक्त इतरत्रच जास्त लक्ष असते. ते त्यांनी अध्यापनाकडे दिल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण मिळू शकेल.शिवसेनेलाही निधी द्यापुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत यावी. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रArvind Kejriwalअरविंद केजरीवाल