शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नांदेडची खिडकी काढून नेली, पण कोल्हापुरची खिडकी शोभा वाढवेल - विजय वडेट्टीवार

By पोपट केशव पवार | Updated: May 5, 2024 12:26 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना टोला लगावला. 

- पोपट पवारकोल्हापूर - भाजपने राष्ट्रवादी, शिवसेनेची घरे फोडली.आमच्याही नांदेडसारख्या काही खिडक्या काढून नेल्या. पण,यामुळे आमचे घर उघडे पडले नाही. उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना टोला लगावला. 

वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान सर्व भ्रष्टाचारी लोकांना नवीन मंडप घालून आपल्या जवळ बसवून घेत आहेत. दुसऱ्यांची घरे फोडत आहेत. आमच्याही घराच्या खिडक्या काढून नेल्या जात आहेत. त्यांनी आमची नांदेडची खिडकी काढून नेली. पण, यामुळे आमचे घर उजाड होणार नाही. कोल्हापुरची खिडकी आमच्या घराची शोभा वाढवेल. सांगलीत विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. पण, आघाडी धर्मामुळे ती जागा शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आमचे काम असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. शाहूंचा विचार संपवण्यासाठीच मुख्यमंत्री कोल्हापुरात   लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. त्यांना शाहू महाराजांच्या विचारांची इतकी भीती का आहे. ते शाहू महाराजांचे विचार संपवण्यासाठीच चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. मात्र, शाहूंचा विचार मारण्यासाठी चार काय ४० दिवस थांबले तरी येथील जनता शाहू विचारांनाच बळ देईल, असा दावा  वडेट्टीवार यांनी केला.राज्यात ३८ जागा जिंकूराज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून किमान ३८ जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील दहाच्या दहा जागांवर आमचा विजय होईल. नितीन गडकरी यांचाही पराभव होईल असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरcongressकाँग्रेसBJPभाजपा