महाराष्ट्र केसरी स्पर्धा मुरगूड येथे भरविणार

By Admin | Updated: January 12, 2015 00:36 IST2015-01-12T00:34:34+5:302015-01-12T00:36:50+5:30

रणजित पाटील : ग्रामीण मल्लांना प्रोत्साहत

Maharashtra Kesari Tournament to be filled at Murugud | महाराष्ट्र केसरी स्पर्धा मुरगूड येथे भरविणार

महाराष्ट्र केसरी स्पर्धा मुरगूड येथे भरविणार

मुरगूड : कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुस्तीला चांगले दिवस येत आहेत; पण ग्रामीण भागातील मल्लांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने ते मागे राहत आहेत. यासाठी मुरगूडमध्ये कुस्ती संकुल लवकरच सेवेसाठी सज्ज राहील. मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दरवर्षी राज्यस्तरीय सर्वोच्च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुरगूडमध्ये भरविणारच, असा विश्वास गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित पाटील यांनी व्यक्त केला.
बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २४ जानेवारीअखेर मुरगूडमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती मोहनराव गुजर होते. मुरगूड बॅँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
रणजित पाटील म्हणाले, स्पर्धेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शाहू कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके, अरुण नरके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील नामांकित मल्लांची नोंदणीसुद्धा झाली आहे.
यावेळी स्पर्धा संयोजनाच्या महत्त्वाच्या सूचना माजी सरपंच शिवाजीराव पाटील, अर्जुन मसवेकर, प्रकाश एकल, मधुकर करडे, राजेंद्र लाडगावकर, आदींनी मांडल्या.
बैठकीस मुरगूडच्या नगराध्यक्षा माया चौगले, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, संतोषकुमार वंडकर, जगन्नाथ पुजारी, सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, संजय मोरबाळे, बजरंग सोनुले, शिवाजी इंदलकर, किरण कुंभार, सुधीर सावर्डेकर, दौलतवाडीचे सरपंच शोभा जाधव, पांडुरंग पुजारी, राजू चव्हाण, दिग्विजय पाटील, अनिल शिंदे, पृथ्वीराज कदम, आदी उपस्थित होते. लाल आखाड्याचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Maharashtra Kesari Tournament to be filled at Murugud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.