शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

maharashtra-karnatak border dispute: तब्बल २४ तासानंतर सुरू झालेली बससेवा पुन्हा बंद, प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:51 IST

खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. याचे संतप्त पडसाद सीमा भागातील मराठी भाषिकांसह महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. काल, बुधवारपासून दोन्ही राज्यातील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. 

दोन्ही राज्यांमध्ये वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडू लागल्याने काल, मंगळवार सकाळ पासून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस थांबवण्यात आल्या. त्या पुन्हा आज, बुधवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे लक्षात आल्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा काही ठिकाणी वाहनांचे नुकसान करण्याचे प्रकार घडू लागल्याने अवघ्या दोन तासातच बससेवा बंद करण्यात आल्या.समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे पडसाद हे सार्वजनिक मालमत्तांवर उमटत असल्याचे दिसून येतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे दोन्ही राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसवरती दगडफेक होत आहे. यासर्व घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांचे हाल होत आहेत.खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूटएसटी बसेस बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. परंतु परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. कागल ते निपाणी या अवघ्या २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र