शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा २६ डिसेंबरला 'चलो कोल्हापूरचा' नारा, बेळगावात झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:28 IST

समितीच्या नेत्यांची अटक, मराठी भाषकांवर अन्याय अशा बाबींविरोधात नोंदवला निषेध

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: येथील सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या महामेळाव्याला यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून रोख लावला. यावेळी झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी, २६ डिसेंबरला 'चलो कोल्हापूर'चा नारा दिला आहे. या संदर्भात आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये कर्नाटक प्रशासनाने १९ डिसेंबर रोजी आयोजिण्यात आलेला महामेळावा ज्यापद्धतीने दडपशाही करून बंद पाडला, आणि त्यानंतर ज्यापद्धतीने समिती नेत्यांना अटक करण्यात आली, मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात आला, या गोष्टीचा निषेध नोंदविण्यात आला. यावर विचारविनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यात आली. कर्नाटकात यापुढे आंदोलन करण्यात आले तर कर्नाटक प्रशासन अशाचपद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय करेल, अशाचपद्धतीने आंदोलने दडपली जातील, युवकांवर खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील यामुळे हि बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी, केवळ सीमावासीयांना पाठिंबा देणारे ठराव मंजूर न करता कृतिशील पाऊले उचलावीत, सर्वपक्षीय बैठक बोलावून महाराष्ट्र बंदची हाक देऊन सीमावासीयांना पाठिंबा दर्शवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

या मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्याची विनंती करण्यात येणार आहे, कर्नाटक सरकार कशापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार  करत आहे, कर्नाटक सरकार लोकशाहीची कशापद्धतीने पायमल्ली करून दडपशाहीचे अस्त्र उगारत आहे, याची इत्यंभूत माहिती दिल्लीदरबारी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती समिती नेते आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीत दिली. 

सोमवारी शिवाजी उद्यान येथे जमून छत्रपती शिवरायांच्या पूजनानंतर कोल्हापूरमधील धरणे आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी सामील व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी आदींसह समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :border disputeसीमा वादkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक