शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
6
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
7
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
8
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
9
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
10
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
11
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
12
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
13
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
14
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
15
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
16
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
17
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
18
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
19
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
20
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

महाराष्ट्र एक्स्प्रेस नव्या एलएचबी कोचसह धावणार, प्रवास आरामदायी होणार; तब्बल ५४ वर्षांनंतर केला बदल

By संदीप आडनाईक | Updated: May 27, 2025 19:39 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : हरिप्रिया, महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ वजनाला हलके, जास्त आसन क्षमता आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या एलएचबी कोचच्या सुविधांचा ...

संदीप आडनाईककोल्हापूर : हरिप्रिया, महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ वजनाला हलके, जास्त आसन क्षमता आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या एलएचबी कोचच्या सुविधांचा लाभ आता महाराष्ट्र एक्सप्रेसचे प्रवासी १ जून पासून घेणार आहेत. या गाडीला १८ नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.भारतीय रेल्वेने सर्व आयसीएफ कोच हटवून त्याऐवजी एलएचबी कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी ही गाडी रोज कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून (ट्रेन क्रमांक ११०३९) १८ एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे तर गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११०४०) ३ जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे. तब्बल ५४ वर्षानंतर हा बदल होत आहे.

  • १ नोव्हेंबर १९७१ : कोल्हापूर-गोंदिया मार्गावर पहिला प्रवास
  • १२ जिल्ह्यांतून प्रवास : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा
  • १३४१ किलोमीटरचा मार्ग
  • २७ तास ४५ मिनिटे : प्रवासाचा वेळ
  • ११० किलोमीटर ताशी वेग
  • २.४५ वाजता : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून मार्गस्थ
  • ६ वाजता : दुसऱ्या दिवशी गोंदिया गंतव्य स्थानावर पोहोचते
  • ६२ स्थानकांवर थांबा

अशी असेल संरचना

  • १ द्वितीय वातानुकुलित कोच
  • ४ तृतीय वातानुकुलित कोच
  • ७ शयनयान कोच
  • ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
  • १ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
  • १ जनरेटर कार

हे आहेत थांबेछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, वळिवडे, रुकडी, हातकणंगले,जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानीनगर, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी, आंबले, घोरपडी, पुणे, उरळी, कोडगाव, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, मनमाड, नंदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, तुळजापूर, शिंदी, अंजनी, नागपूर, इतवारी, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, तिरोडा, गोंदिया

नव्या कोचचे वैशिष्ट्यवजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

लिंके-हॉफमन-बुश कोचचे वैशिष्ट्य

  • लिंके-हॉफमन-बुश (एलएचबी) कोच हे भारतीय रेल्वेचे प्रवासी डबे आहेत, जे जर्मनीतील लिंके-हॉफमन-बुश या कंपनीने विकसित केले आहेत आणि भारतातील कपूरथला, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्समध्ये तयार केले जातात. 
  • हे कोच २००० पासून भारतीय रेल्वेच्या १६७६ मिमी (५ फूट ६ इंच) ब्रॉड गेज नेटवर्कवर वापरले जात आहेत. सुरुवातीला, शताब्दी एक्स्प्रेससाठी जर्मनीहून २४ वातानुकूलित कोच आयात करण्यात आले होते. त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर रेल कोच फॅक्टरीने देशांतर्गत उत्पादन सुरू केले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे