‘महाराष्ट्र’ चाळिसाव्यांदा अजिंक्य

By Admin | Updated: August 15, 2014 00:22 IST2014-08-14T23:56:26+5:302014-08-15T00:22:23+5:30

मुलींत कमला कॉलेजची बाजी : शालेय फुटबॉल स्पर्धा

'Maharashtra' Chalisavant Ajinkya | ‘महाराष्ट्र’ चाळिसाव्यांदा अजिंक्य

‘महाराष्ट्र’ चाळिसाव्यांदा अजिंक्य

कोल्हापूर : जिल्हास्तरीय एकोणीस वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने विवेकानंद कॉलेजवर मात करीत चाळिसाव्यांदा अजिंक्यपदाचा मान पटकाविला, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने के.एम.सी कॉलेजचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
आज, गुरुवारी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने विवेकानंद कॉलेजचा ४-० असा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. आजच्या विजयाने महाराष्ट्र हायस्कूलने सलग चाळीस वर्षे या गटात विजेतेपद मिळविण्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्रकडून शुभम सरनाईकने दोन, तर कार्तिक बागडेकर, प्रतीक बदामे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात कमला कॉलेजने के.एम.सी कॉलेजवर २-० अशी टायब्रेकरवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे महेश जाधव, समीर घोरपडे, पोलीस निरीक्षक गडदे, राजेंद्र घारगे, आप्पासाो पाटील, उदय पवार, प्रदीप साळोखे, आदी उपस्थित होते.
कमला कॉलेजचा संघ
धनश्री देशपांडे, सोनाली जाधव, स्नेहल नलावडे, रोहिणी पाटील, शिवानी सणगर, सोनाली पाटील, मोनालिसा फर्नांडीस, अंकिता माने, ऐश्वर्या कुऱ्हाडे, काजल कांबळे, पूजा घोगळे, श्रृती लाड, सृष्टी नलावडे, प्रशिक्षक रघू पाटील, साधना गावडे.

Web Title: 'Maharashtra' Chalisavant Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.