शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:59 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं ...

समीर देशपांडेकोल्हापूर : निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं लागतं. पदं द्यावी लागतात; परंतु याही पुढे जाऊ ‘साम, दाम, दंड, भेद’ वापरताना काही तंत्रेही अवगत करावी लागतात. यातील एक म्हणजे रिंगणात एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करणे, त्यांच्या चिन्हांमुळे गोंधळ होऊन मतविभागणी व्हावी, यादृष्टीनेही जोडण्या घालाव्या लागतात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, हातकणंगले आणि इचलकरंजी येथे हा खेळ करण्यात आला आहे.शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रकार झाला आहे. या ठिकाणी उद्धवसेनेचे सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरूडकर हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचे चिन्ह मशाल आहे. परंतु त्यांच्याव्यतिरिक्त सत्यजित बाळासाहेब पाटील (आबा), (अपक्ष) चिन्ह चिमणी आणि सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष), चिन्ह गळ्याची टाय असे आणखी दोन सत्यजित पाटील रिंगणात मुद्दाम उतरवण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूनेही ही खेळी खेळण्यात आली आहे. डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जनसुराज्य शक्ती) चिन्ह नारळाची बाग हे अधिकृत उमेदवार असताना आणखी दोन सावकर मैदानात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये विनय वि. कोरगावकर (सावकर) (अपक्ष), चिन्ह भेंडी आणि विनय वि. चव्हाण (सावकर) (अपक्ष), चिन्ह झोपाळा हे रिंगणातील उमेदवार गोंधळ उडवणार आहेत.राधानगरी मतदारसंघात उद्धवसेनेचे कृष्णराव परशराम ऊर्फ के. पी. पाटील (उद्धवसेना) चिन्ह मशाल हे अधिकृत उमेदवार असताना या ठिकाणी अपक्ष चिमणी चिन्ह घेऊन आणखी एक के. पी. पाटील रिंगणात उतरले आहेत. हातकणंगले मतदारसंघात आवळे राजू (बाबा) जयवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्ह हात असताना आणखी एक आवळे शिवाजी महादेव (अपक्ष), चिन्ह बॅट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जनसुराज्य शक्तीचे दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) हे नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत असताना अपक्ष अशोक तुकाराम माने यांनी झोपाळा हे चिन्ह घेऊन लढण्याचे ठरवले आहे.

इचलकरंजीमध्ये मदन सीताराम कारंडे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पाटी-शरदचंद्र पवार), चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे राहुल आवाडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असताना अपक्ष उमेदवार मदन येताळा कारंडे, अंगठी यांच्या नावामुळे संभ्रम वाढणार आहे.

चिन्हावरच द्यावा लागणार भरमतदार मतदानाआधीच प्रक्रिया करून आता गेला की थोडा भांबावतो. यंत्रावरील मतपत्रिका पाहिली की त्याचा गोंधळ उडतो. याच मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी एकाच नावाचे, आडनावाचे उमेदवार रिंगणात उतरवणे, चिन्हांमध्ये साम्य दिसून गोंधळ होईल, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आता उमेदवारांना चिन्हावरच भर द्यावा लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shahuwadi-acशाहूवाडीVinay Koreविनय कोरेSatyajit Patilसत्यजित पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024