शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीचा निर्णय अमान्य; ‘स्वाभिमानी’त फूट, मादनाईकांसह पदाधिकाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा

By राजाराम लोंढे | Updated: November 9, 2024 18:56 IST

चळवळ, आंदोलनाबाबत पूर्ववतच भूमिका

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शनिवारी उभी फूट पडली. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य समन्वय समितीचे सदस्य सावकार मादनाईक यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत आतापर्यंतच्या राजकीय पीछेहाटचे चिंतन गरजेचे आहे. चळवळ व आंदोलनाबाबत आमची भूमिका पूर्ववतच राहील, असे सावकार मादनाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी तिसऱ्या परिवर्तन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना आवडला नसल्याने त्याचे पडसाद गेली महिनाभर उमटू लागले आहेत. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर इतर पदाधिकारीही अस्वस्थ होते.‘हातकणंगले’तून उमेदवार नाकारल्यावरून जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी संघटनेला रामराम केला. आता सावकार मादनाईक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर करून राजू शेट्टी यांना हादरा दिला आहे.या पत्रकावर सावकार मादनाईक, संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके, सतीश हेगाणा, सागर मादनाईक, संजय चौगले, विलास पाटील, पायगोंडा पाटील, रावसाहेब डोंगळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

गेल्या २५ वर्षात संघटनेतील अनेकांनी लाठ्याकाठ्या खाल्या, जेलमध्ये गेले. मात्र, राजकारणात आमची पीछेहाट झाली. याचे चिंतन व्हायला पाहिजे. राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीचा निर्णय आम्हाला अमान्य असून आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. - सावकार मादनाईक

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरshirol-acशिरोळSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024