शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Kolhapur North Vidhan Sabha Election 2024: राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूरचं ‘उत्तर’

By भारत चव्हाण | Updated: November 24, 2024 18:33 IST

२९ हजार ५६३ मतांनी विजयी : लाटकर यांचा दारुण पराभव, कोल्हापूर शिवसेनेचा बालेकिल्ला स्पष्ट

भारत चव्हाणकोल्हापूर : टक्केवारी, गद्दारी, दादागिरी, बोका अशी गंभीर स्वरूपाची वैयक्तिक पातळीवर जहरी टीका झाल्यानंतरही त्याच्याशी आपले काही देणेघेणे नसल्याचे दाखवीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील जनतेने विकासाच्या पारड्यात मत टाकताना शिवसेनेच्या राजेश विनायकराव क्षीरसागर यांना तब्बल २९ हजार ५६३ इतक्या मताधिक्याने विजयी केले. प्रचाराच्या दरम्यान अतिशय धीराने तसेच संयमाने टीकेला सामोरे जात क्षीरसागर यांनी विरोधकांच्या टीकेला टीकेने उत्तर न देता केलेल्या विकासकामांचे कार्ड जनतेसमोर ठेवून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश भरत लाटकर यांना चारमुंड्या चित केले.महाविकास आघाडीत ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा कोणत्या पक्षाला द्यायची, जागावाटप झाल्यानंतरही काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावर जोरदार घमासान झाले. अखेर राजेश लाटकर या अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करून महायुतीच्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात मैदानात उतरविले. त्यामुळे महायुतीचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात सरळ लढत झाली. विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच उतरून आव्हान निर्माण केलेल्या लाटकर यांनी जोरदार लढत दिली, त्यांच्यासाठी मविआच्या नेत्यांनी सर्व ताकद उभी केली. परंतु त्यांना जिंकण्यापर्यंत मजल मारता आली नाही.शासकीय धान्य गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतपत्रिका मोजण्यात आल्या. त्यानंतर ‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली. राजेश लाटकर यांनी पहिल्या फेरीतच ७०१४ मते मिळवत क्षीरसागर यांच्यावर २४४२ इतके मताधिक्य मिळवून खाते उघडले. सहाव्या फेरीअखेर त्यांचे हे मताधिक्य साडेपाच हजारांपर्यंत पोहचले. त्यानंतर मात्र त्यांचे मताधिक्य खाली खाली घसरायला लागले. मतमोजणीच्या तेराव्या फेरीअखेर लाटकर यांचे मताधिक्य कमी होऊन राजेश क्षीरसागर यांची बॅटिंग सुरू झाली. तेराव्या फेरीपासून क्षीरसागर यांनी चढत्या क्रमाने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली, ती तेविसाव्या फेरीत विजय मिळवूनच थांबले. ईव्हीएम’वरील मतदानात क्षीरसागर यांनी शेवटच्या फेरीअखेर २९ हजार ५६३ इतके विजयी मताधिक्य मिळविले.लाटकर यांना कसबा बावडा, लाईनबाजार, सदरबाजार, विचारेमाळ, भोसलेवाडी, जाधववाडी, शिवाजी पार्क, टाकाळा, रुईकर कॉलनी या परिसरात चांगली मते मिळाली. तर क्षीरसागर यांनी याच परिसरात अंदाजे चाळीस टक्क्यांपर्यंत मते घेतली. बाराव्या फेरीपर्यंत हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर क्षीरसागर यांचा विजय निश्चित झाला. क्षीरसागर यांना त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठेसह उत्तेश्वर, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. लाटकर यांना येथे मोठा फटका बसला.

क्षीरसागर तिसऱ्यांदा विधानसभेतराजेश लाटकर हे तिसऱ्यांदा विधानसभेत जात आहेत. याआधी ते २००९ व २०१४ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिकची संधी होती, परंतु ऐनवेळी भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेल्या स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते समाजकार्यात सक्रिय झाले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राज्यभरात कार्याचा ठसा उमटविला.

विजयाची कारणे -

  • पाच वर्षांतील जनसंपर्क
  • कोल्हापूरसाठी आणलेला विकास निधी
  • भाजपसह राष्ट्रवादीचेही पाठबळ, सत्यजित कदम यांची मदत
  • जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेत कट्टर कार्यकर्त्यांचे विणले जाळे

पराभवाची कारणे -

  • उमेदवारीचा घोळ, हात चिन्ह मिळाले नाही.
  • निवडणूक तयारीचा अभाव, नवखा उमेदवार.
  • महाविकास आघाडीत एकवाक्यतेचा अभाव
  • मधुरिमा यांच्या माघार नाट्याने झालेली पीछेहाट

उमेदवार व त्यांचा मिळालेली मते अशी -१. अभिजित दौलत राऊत- मनसे : २०३६२. राजेश विनायक क्षीरसागर - शिवसेना : ११,१०८५३. शाम भीमराव पाखरे - बसप : ५४४४. संजय भिकाजी मागाडे - अपक्ष :१७३५. चंद्रशेखर श्रीराम मस्के - अपक्ष : १३४६. दिलीप जमाल मोहिते - अपक्ष : ३३८७. राजेश भरत लाटकर -अपक्ष : ८१,५२२८. विनय विलास शेळके - अपक्ष : २०२९. शर्मिला शैलेश खरात - अपक्ष : २२२१०. शिरीष रामकृष्ण पुणतांबेकर - अपक्ष : २४५११. सदाशिव गोपाल कोकीतकर - अपक्ष : २९४नोटा - २२७६एकूण झालेले मतदान - १९७,६६५

हा विजय स्वाभिमानी जनतेचा असून, कोल्हापूरचे खरे उत्तर जनतेने विरोधकांना दिले आहे. जनतेने दिलेला आशीर्वाद सार्थकी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट करून विकासात मोलाचे योगदान देऊ. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे निकालाने स्पष्ट झाले. प्रचारामध्ये विरोधकांनी बदनाम करण्याचा केलेला केविलवाणा डाव जनतेने हाणून पाडला. - राजेश क्षीरसागर, विजयी उमेदवार शिवसेना

जनतेने दिलेला कौल मान्य आहे. माझी उमेदवारी उशीरा झाली. पक्षाचे चिन्ह मिळण्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे कमी वेळात एक नवीन चिन्ह घेऊन मतदारांसमोर गेलो. तरीही ८१ हजाराहून अधिक मते मिळाली. मतदारांचे आभार. पराभवाने खचून न जाता भविष्यात अधिक ताकदीने काम करणार आहे. - राजेश लाटकर, पराभूत उमेदवार

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024